बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणजेच ईशा कोपिकरने इंडस्ट्रीपासून फारकत जरी घेतली असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. ईशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. आता ईशाने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ईशा दुसऱ्यांदा आई झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईशाच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे ज्याची झलकही तिने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ईशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या घरी येणाऱ्या छोट्या पाहुण्याची झलक दाखवली आहे. व्हिडिओमध्ये ईशा पहिल्या सोनोग्राफीचा फोटो दाखवताना दिसत आहे. त्यानंतर ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ जसा संपतो तसं लोकांच्या लक्षात येतं की ईशाकडे लहान बाळ नव्हे तर एक कुत्र्याचं छोटं पिल्लू आलं आहे. ते पिल्लू पाहताच ईशाची मुलगीही तिच्याशी खेळताना दिसत आहे.

आणखी वाचा : स्कीन फिट टॉप अन् पांढऱ्या मिनी स्कर्टमध्ये कियारा अडवाणीचा ग्लॅमरस अंदाज; स्कर्टची किंमत ऐकून व्हाल चकित

ईशाच्या या व्हिडीओने बऱ्याच लोकांना बुचकळ्यात टाकलं आहे. बऱ्याच लोकांनी तशा कॉमेंटही केल्या आहेत. व्हिडीओ शेअर करताना ईशाने लिहिले – “मी तुम्हा सर्वांपासून ही गुड न्यूज लपवून ठेवली होते. पण मी ही गंमत जास्त काळ तुमच्यापासून लपवू शकलो नाही.” ईशाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. “आता पेढे कधी मिळणार?” असाही प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे.

ईशाने २००९ मध्ये टिमी नारंगशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे जिला ईशाने २०१४ मध्ये जन्म दिला. ईशा आता चित्रपटात जरी दिसत नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्षेत्राशी अन् चाहत्यांशी जोडलेली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress isha koppikar is flaunt baby bump shares video on social media avn