बॉलिवूडच्या ग्लॅमरचा परिणाम सगळ्यांवरच होतो. बरेच कलाकार आपल्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे बोलतात काही लोक त्यांच्या व्यसनाबद्दलही बोलतात. ग्लॅमरच्या विश्वात ही व्यसनं खूपच सर्रास झाली आहेत, खरंतर सामान्य लोकसुद्ध व्यसनं करतात पण जेव्हा एखादी सेलिब्रिटी व्यसन करत असेल तर त्याचा समाजावर वेगळाच परिणाम होतो, आणि त्यातून एखादी स्त्री व्यसन करत असेल तर तिच्याबद्दल आणखी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. याचबद्दल अभिनेत्री सीमा पाहवा यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते मनोज पाहवा यांच्या पत्नी सीमा पाहवा यांनी नुकताच युट्यूबवरील ‘Unfiltered by Samdish’ या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान सिगारेट ओढणाऱ्या मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सिगारेट ओढणाऱ्या मुली त्यांना खूप आवडतात असं वक्तव्य त्यांनी या मुलाखतीमध्ये केलं आहे. ही गोष्ट सांगताना त्यांनी त्यांचा एक किस्सादेखील शेअर केला आहे.

आणखी वाचा : “तू ड्रग्स वगैरे…” जेव्हा शाहरुख खानने डिप्रेशनमध्ये गेलेल्या कपिल शर्माची केलेली विचारपुस

धूम्रपानबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सीमा पाहवा म्हणाल्या, “मी सिगारेट ओढत नाही, मला ते आवडत नाही पण ज्या मुली सिगारेट ओढतात त्या मला खूप आवडतात, मुलींच्या हातात सिगारेट आहे आणि त्या सिगारेटचे झुरके सोडत बोलत आहेत हे दृश्य मला बघायला खूप आवडतं कारण ते खूप स्टाईलीश वाटतं. जुन्या काळात सिगारेट ओढणाऱ्या मुलींकडे स्टाईल स्टेटमेंट म्हणून पाहिलं जायचं. त्यामुळे तेव्हा मीसुद्धा माझ्या पर्समध्ये सिगारेटचं पाकीट ठेवायला सुरू केली, जेणेकरून पर्स उघडताना ते पडेल आणि माझं इंप्रेशन पडेल. अर्थात मला सिगारेट ओढायची नव्हती त्यामुळे त्या पाकीटातील सिगारेट मी कोणाला हवी असल्यास वाटायचे. मी स्वतः सिगारेट ओढली नाही.”

सीमा पाहवा यांनी १९८४ मध्ये ‘हम लोग’ या चित्रपटातून या मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. सीमा पाहवा यांना अलीकडे खूप वेगवेगळ्या आणि उत्तम भूमिका मिळायला सुरुवात झाली आहे. ‘आंखों देखी’, ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप पसंत पडल्या. नुकतीच आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress seema pahwa says she likes the girls who smokes cigarette avn