अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र आहे. आपल्या कामामधून वेळ काढत संजयने कॉमेडी शो ‘केस तो बनता है’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने हजेरी लावताच त्याचा या भागामधील दिलखुलास अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे. या शोदरम्यान संजयने त्याच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. संजयला यावेळी त्याच्या जेलमधील दिवसांची आठवण झाली. यादरम्यानचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : गाढ झोपलेल्या नवऱ्याबरोबर कतरिना कैफने केलं असं काही की…; बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संजय दत्तचा खरेपणा त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो. ‘केस तो बनता है’मध्ये त्याला कोर्टरुममध्ये बसवण्यात येतं. तसेच त्याच्यावर यादरम्यान मजेशीर आरोप करण्यात येतात. यावेळी या शोची जज कुशा कपिला त्याला विचारते, “तुझ्यावर जे मजेशीर आरोप लावण्यात आले आहेत त्याबाबत तू काय सांगशील?” यावर संजय अगदी हास्यास्पद उत्तर देतो.

पाहा व्हिडीओ

तो म्हणतो, “इथे जेवढे आरोप माझ्यावर करण्यात आले ते खरंच मजेशीरच आहेत. पहिल्यांदाच कोर्टात माझ्याबरोबर असं झालं आहे की माझ्यावर मजेशीर आरोप करण्यात आले आहेत. आजपर्यंत माझ्यावर असे मजेशीर आरोप करण्यात आलेले नाहीत. सगळे गंभीर आरोप करण्यात आले. तेव्हा माझी अवस्था वाईट झाली होती.”

आणखी वाचा – करीनाचा लेक जमिनीवर लोळला तर आलियाने लपवलं बेबी बंप, कपूर कुटुंबियांचं दिवाळी सेलिब्रेशन पाहिलंत का?

संजयची ही गोष्ट ऐकून शोमध्ये उपस्थित सगळी मंडळी पोट धरून हसू लागतात. संजय अगदी डॅशिंग अंदाजामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओमध्ये देताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचीही पसंती मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case toh banta hai show sanjay dutt talk about his days in real life court case watch video kmd