Dangal Girl Zaira Wasim got married : इस्लाम धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने लग्न केलं आहे. ‘दंगल’ फेम झायला वसीमने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करून लग्न केल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली. झायराची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

झायराने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत ती निकाहनाम्यावर सही करतेय. तर दुसरा फोटो तिच्या पतीबरोबरचा आहे. या फोटोत ती व तिचा पती चंद्राकडे बघत आहेत. हा त्यांचा पाठमोरा फोटो आहे. झायरा व तिचा पती दोघांचाही चेहरा यात दिसत नाही.

झायरा वसीमने हे फोटो शेअर करताना छोटसं कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये तिने मोजकेच शब्द लिहिले आहे. ‘Qubool hai x3’ असं लिहून झायरा वसीमने ही पोस्ट केली आहे. तिच्या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आयुष्यातील नवीन प्रवासासाठी तिला चाहते शुभेच्छा देत आहेत.

पाहा पोस्ट

दरम्यान, झायरा वसीमचा पती कोण आहे, त्याबद्दल माहिती अद्याप समोर आलेली नाही. झायराने फोटोंमध्ये त्याचा चेहरा दाखवलेला नाही.

झायरा वसीमने बॉलीवूड का सोडलं होतं?

Why Zaira Wasim Left Bollywood : ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने इंडस्ट्रीत ५ वर्षे पूर्ण झाल्यावर कलाविश्व सोडले. “कलाविश्वात जरी माझी प्रगती होत असली, जरी मी इथे योग्य वाटत असले तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,” असं झायरा तिच्या पोस्टमध्ये म्हणाली होती. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

झायरा वसीमने दंगल, द स्काय इज पिंक, सिक्रेट सुपरस्टार, स्नो फ्लॉवर्स या सिनेमात काम केलंय.