‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने विवेक अग्निहोत्री हे नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.अधमधून या चित्रपटाची चर्चा सुरु असतेच. या चित्रपटाला जगभरातुन प्रतिसाद मिळाला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आता ते त्यांच्या पुढील चित्रपटाच्या तयारीस लागले आहेत.

‘द काश्मिर फाइल्स’च्या घवघवीत यशानंतर विवेक रंजन अग्निहोत्री आणखी एक अनोखा विषय घेऊन येत असल्याने प्रत्येक भारतीय प्रेक्षकाला उत्सुकता लागली आहे. शिवाय हा विषय कोरोना काळातील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात असल्याने या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट वैज्ञानिकांची एक प्रेरणादायी कथा सांगेल ज्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांशिवाय जगातील सर्वात सुरक्षित लस तयार केली.

शाहरुख-दीपिकाच्या ‘बोल्ड’ गाण्यावर विवेक अग्निहोत्रींची अप्रत्यक्ष टीका, म्हणाले “इन्स्टाग्राम रिल्स…”

या चित्रपटासंदर्भात विवेक अग्निहोत्री यांनी वेळोवेळी सोशल मीडियावर माहिती दिली. आता या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरवात झाली आहे. मात्र अद्याप या चित्रपटात कोणते कलाकार असतील याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र चाहते आता उत्सुक आहेत यात नेमके कोणते कलाकार असतील हे पाहण्यासाठी त्यामुळे येत्या काही काळात स्पष्ट होईलच.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.