Dr Hedgewar Movie released: सध्या अनेक हिंदी मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच ‘डॉ. हेडगेवार’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. १ ऑगस्ट २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
डॉ. हेगडेवार चित्रपट झाला प्रदर्शित
चित्रपटाचा प्रीमियर सन सिटी सिनेमा, विलेपार्ले येथे पार पडला. त्यावेळी राज दत्त, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, अजिंक्य देव, अंगद म्हसकर, भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, विलेपार्ले विधानसभा आमदार पराग आळवणी हे उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाची संकल्पना व निर्मिती जयानंद शेट्टी यांची आहे. विशेष म्हणजे जयानंद शेट्टी यांनीच डॉ. हेडगेवार यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील गाणी अनुप जलोटा, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, शंकर महादेवन, अवधूत गुप्ते यांनी गायली आहेत..
राधास्वामी अवुला यांनी ही या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच दिग्दर्शनही राधास्वामी अवुला यांनी केले आहे. अक्षय शेट्टी प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
शंकर महादेवन यांनी दिल्या चित्रपटाच्या टीमला खास शुभेच्छा
लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करीत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मी शंकर महादेवन डॉ. हेगडेवार या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. या चित्रपटातील संगीताची जबाबदारी संजय राज गौरीनंदनजींनी सांभाळली आहे. मला या चित्रपटात एक सुंदर गाणे गाण्याची संधी मिळाली. मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा देतो.
डॉ. हेगडेवार चित्रपट कोणत्या चित्रपटगृहांत पाहता येईल?
१) सन सिटी सिनेमा, विलेपार्ले पूर्व – सायंकाळी ५.४५ वा.
२) संगम सिनेमा, अंधेरी – सायंकाळी ६ वा.
३) हब मॉल, गोरेगाव पूर्व – रात्री ९ वा.
४) मॅक्सस सिनेमा, साकीनाका – सायंकाळी ७.३० वा.
५) क्युबिक मॉल, चेंबूर- सायंकाळी ६ वाजता.