‘द काश्मीर फाइल्स’ हा २०२२ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट ऑस्कर २०२३ साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. भारतातून ऑस्करसाठी निवडलेल्या पाच चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


ट्वीट करत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “ऑस्कर २०२३च्या पहिल्या यादीत द काश्मीर फाइल्स चित्रपट शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. हा भारतातील पाच चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाशी संबंधित सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक उत्तम वर्ष आहे.”

इतकेच नाही तर ‘द काश्मीर फाइल्स’च्या कलाकारांपैकी पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत निवडण्यात आले आहे. “ही फक्त सुरुवात असून आणखी खूप दूरचा टप्पा गाठायचा आहे,” असंही विवेक यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या मल्टिस्टारर चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याची टीकाही झाली होती.

‘कांतारा’ची घोडदौडही कायम!

कारण अभिनेता रिषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कन्नड चित्रपट कातारा चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणींमध्ये अकादमी पुरस्कार पात्रता यादीत स्थान मिळवले आहे. रिषभ शेट्टीने याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे.

रिषभ शेट्टीने चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filmmaker vivek agnihotri claims the kashmir files shortlisted for oscars 2023 hrc