Genelia Deshmukh Shared A Post : जिनिलीया देशमुख बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तिच्या सहजसुंदर अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि तिथेही तिचे लाखोंमध्ये फोलोअर्स आहेत. जिनिलीया अनेकदा तिच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडीओ त्यामार्फत पोस्ट करीत असते.
जिनिलीयाने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्याला तिने खास कॅप्शनही दिली आहे. यावेळी तिने तिच्या भावासाठी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली आहे. भावाच्या वाढदिवसानिमित्त तिने त्याला शुभेच्छा देत त्याचं कौतुक केल्याचं यामधून पाहायला मिळतं.
जिनिलीया देशमुखने केलं भावाचं कौतुक
जिनिलीयाने तिचा भाऊ निगेल डिसोझाच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टला तिने, “आज जेव्हा कोणी माझ्याकडे येऊन विचारतात की, तू निगेल डिसोझाची बहीण आहेस ना? तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. कारण- मला माहीत आहे हे सगळं तू स्वबळावर कमावलं आहेस. तू खूप मेहनत करून आज जिथे आहेस, तिथे पोहोचला आहेस. हे सगळं तू स्वत: केलं आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा निगू पिगू… तुला गरज असेल तेव्हा मी नेहमी तुझ्याबरोबर असेन” असे तिने लिहिले आहे.
जिनिलीयाने यावेळी तिचा भाऊ आणि मुलांबरोबरचा गोड फोटो शेअर केला आहे. जिनिलीया बऱ्याचदा तिचा धाकटा भाऊ निगेलसाठी सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. अनेकदा ती त्याचं कौतुक करताना दिसते. मोठी बहीण म्हणून जिनिलीयाला तिच्या धाकट्या भावाचा खूप अभिमान असल्याचं तिनं शेअर केलेल्या पोस्टमधून दिसतं.
जिनिलीया यासह अनेकदा तिचा नवरा अभिनेता रितेश देशमुख, त्यांची मुलं, देशमुख कुटुंबीय या सगळ्यांबरोबरचे फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. अनेकदी ती व रितेश रीलही बनवत असतात. त्यांच्या या रीलला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
दरम्यान, जिनिलीयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच ती आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेली. त्यासह नुकातच तिचा एक दाक्षिणात्य चित्रपटही प्रदर्शित झालेला. त्यानंतर अभिनेत्री कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरेल.