अभिनेत्री कंगना रणौत आता ट्विटरवर परतली आहे. ती ट्विटरवर येऊन काही दिवस झाले आहेत आणि ती या प्लॅटफॉर्मवर प्रचंड सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिने आज काही ट्वीट केले आहेत, त्यात ती ‘पठाण’च्या यशाबद्दल बोलली आहे. तसेच शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हिट झाला असला तरी देश ‘जय श्री राम’ चा जयघोष करेल, असं तिने म्हटलं आहे. भारताचे प्रेम आणि सर्वसमावेशकता शाहरुख खानच्या चित्रपटाला यश मिळवून देत आहे, असंही कंगना म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“असे चित्रपट…”, शाहरुख खानच्या ‘पठाण’वर कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया

“पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा केला जात आहे. याच्याशी मी सहमत आहे, पण कोणाचे प्रेम कोणाच्या द्वेषावर? कोण चित्रपटाची तिकीटं विकत घेत आहे आणि त्याला हिट करत आहेत? होय, हे भारताचे प्रेम आहे जिथे ८० टक्के हिंदू राहतात आणि तरीही पठाण नावाचा चित्रपट चालत आहे,” असं कंगना म्हणाली.

तिने पुढे लिहिलं, “माझा विश्वास आहे की भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत आणि अफगाण पठाणांपेक्षा खूप वेगळे आहेत. मुख्य म्हणजे भारत कधीही अफगाणिस्तान होणार नाही, अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, तिथली परिस्थिती नरकासारखी आहे. त्यामुळे पठाण पाहिल्यानंतर त्याचं नाव इंडियन पठाण असायला हवं, असं मला वाटतं,” असं कंगना म्हणाली.

आणखी एका दुसर्‍या ट्विटमध्ये, शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रोपगंडा असल्याचं म्हटलं होतं. “चित्रपट उद्योगाला राजकीय प्रचाराचा धसका सहन करायचा नसेल तर त्यांनी त्यांच्या चित्रपटांचा वापर करून अशा प्रचाराचा निषेध केला पाहिजे,” असे कंगना म्हणाली होती.

दरम्यान, कंगनाने दावा केली की “पठाण चित्रपटात आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तान आणि ISIS वर प्रकाश टाकण्यात आला आहे. द्वेष आणि जजमेंटच्या पलीकडे असलेली ही भारताची भावना त्याला महान बनवते. हे भारतावरील प्रेम आहे, ज्याने द्वेष आणि शत्रूंच्या राजकारणावर विजय मिळवला आहे. पण, ज्यांना खूप आशा आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो, पण इथे कायम जय श्री रामच्या घोषणा होतील,” असं कंगना म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian muslims are patriotic syas kangana ranaut wants to rename shah rukh khan pathaan to indian pathaan hrc