scorecardresearch

“असे चित्रपट…”, शाहरुख खानच्या ‘पठाण’वर कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया

नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगना रणौतने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत केलं मोठं वक्तव्य

kangana ranaut, shah rukh khan, pathan review, pathan first day collection, pathan collection, kangana ranaut praises shah rukh movie, kangana ranaut praises pathaan, कंगना रणौत, शाहरुख खान, पठाण
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या सगळीकडेच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरामन करणाऱ्या शाहरुख खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मागच्या बऱ्याच महिन्यापासून बंद असेलेली चित्रपटगृह आता हाऊसफुल झाली आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. शाहरुखचा या चित्रपटातील अॅक्शन अवतार चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला आहे. अनेक सेलिब्रेटींनीही शाहरुखच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहे. पण नुकतीच कंगना रणौतने या चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कंगनाने शाहरुखच्या ‘पठाण’वर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कंगना रणौतने ट्विटरवर पुनरामन केलं होतं आणि त्यानंतर तिने संपूर्ण बॉलिवूडबाबत केलेलं वक्तव्य केलं होतं. कंगनाने बॉलिवूडबाबत केलेलं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत असतानाच आता तिचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’च्या रॅप अप पार्टीमध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने यावेळी ‘पठाण’बद्दल बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा- २४० कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘पठाण’! शाहरुखने १०० नव्हे तर घेतले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या दीपिका-जॉनला किती मानधन मिळालं?

शाहरुख खानच्या चित्रपटाचं कौतुक करताना कंगना म्हणाली, “पठाण चित्रपट चांगला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. असे चित्रपट चालायलाच हवेत आणि मला वाटतं आपली हिंदी चित्रपटसृष्टी मागच्या काही दिवसांपासून कुठेतरी मागे पडत होती. पण आता सगळेजण आपल्या पद्धतीने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.”

आणखी वाचा- शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित होताच बॉलिवूडवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, “चित्रपटसृष्टीचा दर्जा…”

दरम्यान शाहरुखा खानची मुख्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचं बजेट २५० कोटी एवढं आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मची असून दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने आतापर्यंत संपूर्ण देशभरात ५१ कोटींचा गल्ला जमवला असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:21 IST
ताज्या बातम्या