बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. गेले काही दिवस सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या त्यांच्या लग्नाला त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि बॉलिवूडमधील त्यांच्या काही जीवाभावाची मंडळीही उपस्थित होती. या लग्नाला ईशा अंबानीही उपस्थित होती. आता या लग्नातील तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईशा अंबानी ही कियारा अडवाणीची खास मैत्रीण. गेली अनेक वर्ष त्या एकमेकींना ओळखतात. त्यांच्यामुळे अंबानी आणि अडवाणी कुटुंबियांचेही खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला ईशा आवर्जून आली होती. पण आतापर्यंत या लग्नातील तिचा एकही फोटो समोर आला नव्हता. पण आता अखेर या लग्न सामारंभातील कियारा आणि ईशाचा एक फोटो समोर आला आहे.

आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल आवाक्

या फोटोमध्ये कियाराबरोबर कियाराची बहीण अनिसा मल्होत्रा आणि ईशा अंबानी दिसत आहेत. हा फोटो कियाराच्या संगीत सेरेमनीच्या वेळचा आहे. या कार्यक्रमाच्या वेळी तिघींनीही घागरे परिधान केलेले दिसत असून त्या त्यांनी एकमेकींना मिठी मारत हा फोटो काढला आहे. हा फोटो समोर आल्याने ईशा अंबानीचा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील लूकही समोर आला आहे. या लग्नसोहळ्यातील सर्व कार्यक्रमांसाठी अगदी साधा आणि सोबर लूक ईशाचा होता. आता या फोटोवर नेटकरी कमेंट करत ईशाच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

दरम्यान सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा ५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये संपन्न झाला. परांपारीक पद्धतीने आणि राजेशाही थाटात त्यांचं लग्न झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isha ambani unseen photo from siddharth malhotra and kiara advani wedding gets viral rnv