बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यापूर्वी खूप संघर्ष केला. ते अनेकदा त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की ते आजही मुंबईतील त्या चाळीला भेट देतात जिथे त्यांनी आयुष्याची ३३ वर्षे घालवली. त्या चाळीला भेट दिल्यानंतर भावुक होत असल्याचंही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ते मला रात्री घरी घ्यायला यायचे अन्…”, अमिताभ व जया बच्चन यांच्या डेटिंगच्या दिवसांबद्दल दिग्गज अभिनेत्रीने सांगितल्या आठवणी

‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी यांनी सांगितलं की ते अजूनही त्या चाळीला भेट देतात कारण त्याच्याशी अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत. ते म्हणाले, “मी नुकतीच त्या चाळीला भेट दिली. तिथे ८९ वर्षीय आजीचा वाढदिवस साजरा केला आणि माझे जुने मित्र आणि इतर लोकांना भेटलो. मी माझ्या आयुष्यातील ३३ वर्षे तिथे घालवली आहेत. त्यामुळे त्या चाळीसाठी माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल.”

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

यावेळी जॅकी श्रॉफ यांनी हातावर आणि मानेवर स्कार्फ घालण्याच्या त्यांच्या स्टाइलबद्दलही विचारण्यात आले. यामागील प्रेरणा विचारल्यावर जॅकी श्रॉफ म्हणाले की त्यांना रुमाल खूप आवडतात. आईची साडी अशा रितीने पकडून ठेवल्याने मला शांती मिळायची. त्यामुळे अशा मऊ कपड्याची सवय झाली आणि मी रुमाल सोबत ठेवू लागलो, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘बाप’मध्ये दिसणार आहे, ज्यात संजय दत्त, सनी देओल आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jackie shroff visited chawl where he lived for 33 years hrc