निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिने आतापर्यंत वेळा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु तरीही तिच्या म्हणावं तितकं यश मिळालेलं नाही. आपले बॉलिवूड चित्रपट म्हणावे तितके यशस्वी होत नाहीत हे कळताच तिने आता आपला मोर्चा दक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला आहे. आता ती दाक्षिणात्य चित्रपटामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवीचा आतापर्यंतच्या सर्वच बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई केली नाही. त्यामुळे तिने आता आपल्या करिअरला वेगळं वळण देण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड पाठोपाठ आता ती तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.

आणखी वाचा : Video: अक्षय कुमारच्या मुलाला विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी थांबवलं, व्हिडीओ चर्चेत

मीडिया रिपोर्टनुसार जान्हवी ज्युनियर एनटीआरच्या ‘एनटीआर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे जान्हवी या चित्रपटाच्या शूटिंगला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात करेल असंही समोर आलं आहे. हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा : करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण केल्याचा जान्हवी कपूरला पश्चाताप? म्हणाली, “त्यावेळी मला…”

जान्हवी दक्षिणात्य चित्रपटात दिसणार ही बातमी समजतच नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. जान्हवीचे चाहते तिच्या या बातमीने प्रचंड खुश झाले आहेत. तर दुसरीकडे अनेक जण जान्हवीच्या बॉलिवूड चित्रपटांबरोबरच तिचे दाक्षिणात्य चित्रपटही फ्लॉप होतील असं म्हणताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhavi kapoor will be sharing screen with junior ntr rnv