बॉलिवूड स्टार्ससारखंच त्यांच्या मुलांकडेही सगळ्यांचे लक्ष असतं. अनेक स्टार किड्सची मुलं मनोरंजन सृष्टीत नसूनही चर्चेत असतात. अक्षय कुमार याचा मुलगा आरव हा त्यातलाच एक आहे. सध्या आरवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल चर्चेत आला आहे. यावेळी होत विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी आरवला गेटपाशी थांबवून ठेवल्याचं दिसत आहे.

आरव सध्या युकेमध्ये शिक्षण घेत आहे. अधून मधून तो कुटुंबीयांना भेटायला मुंबईत येत असतो. तो नुकताच मुंबईच्या विमानतळावर दिसला. हातात जॅकेट घेऊन तो घाईने आत जात होता. पण मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला गेटपाशी थांबवलं. त्याला थांबवल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : ..आणि मुलाच्या बाबतीत भावूक झाला अक्षय कुमार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूड कलाकार किंवा त्यांची मुलं यांना सहसा एन्ट्री गेटपाशी थांबवून ठेवलं जात नाही. या सर्वांना व्हीआयपी एन्ट्री दिली जाते. यावेळी आरवच्या बाबतीत तसं झालं नाही. सुरक्षारक्षकांनी आरवला गेटपाशी थांबवलं आणि त्याची कागदपत्र तपासण्यासाठी मागितली. ही सगळी कागदपत्र तपासल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला आतमध्ये जाऊ दिलं. ही कागदपत्र तपासण्यासाठी वेळ लागल्याने आरवला तिथे थांबावं लागलं. याचा व्हिडीओ ‘व्हायरल भयानी’ने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.