अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली अभिनयापासून दूर आहे. पण सध्या ती तिच्या एका स्पेशल शोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. यात बच्चन कुटुंबाची गुपितं उघड होताना दिसत आहेत. नव्यासह तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चनही या पॉडकास्ट शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. या पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये श्वेता आणि जया बच्चन यांनी नव्याला एक नंबरची खोटारडी असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या नवेलीचा पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या’च्या तिसऱ्या एपिसोडमध्ये श्वेता आणि जया बच्चन यांनी नव्या नवेली खूप खोट बोलते असा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर ती खोट बोलण्यात एवढी कमकुवत आहे की प्रत्येक वेळी ती खोट बोलताना रंगेहात पकडली जाते. नव्या नवेलीचे किस्से आजी जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी या पॉडकास्टमध्ये शेअर केले.

आणखी वाचा- “मी तिचा मार…” लेक श्वेताने केला जया बच्चन यांच्या एका वाईट सवयीचा खुलासा

पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये श्वेता बच्चन म्हणाली, “काही वर्षांपूर्वीच ख्रिसमस पार्टीसाठी नव्या आणि तिचा भाऊ अगस्त्य बाहेर गेले होते. दोघांनाही घरातून एका विशिष्ट वेळेत घरी परतण्यास सांगितलं गेलं होतं, पण ती वेळ निघून गेली होती आणि मुलं घरी आली नव्हती. तर मी नव्याला कॉल केला आणि ते कुठे आहेत आणि किती वेळ लागणार आहे हे विचारलं. त्यावर नव्याने मला सांगितलं की ते दोघंही घरी आलेत आणि घराच्या आसपासच फिरत आहेत. पण त्यावेळी दोघंही पार्टीमध्ये होते. त्यावर मी म्हटलं तुम्हाला आई मूर्ख वाटते का?”

आणखी वाचा- सचिन पिळगांवकर की अमिताभ बच्चन; नक्की सिनीअर कोण? जेव्हा खुद्द बिग बींनीच दिली होती कबुली

याशिवाय नव्याची आजी जया बच्चन यांनीही तिचा एक किस्सा सांगितला, “एकदा नव्या बाहेर गेली होती, जोपर्यंत मुलं घरी येत नाहीत तोपर्यंत मला झोप लागत नाही. मी उठले आणि नव्याची वाट पाहत होते. बाहेर अंधार होता आणि एवढा उशीर होऊनही नव्या घरी परतली नव्हती. त्यामुळे मी तिला कॉल केला. तर ती म्हणाली, ती बऱ्याच वेळापूर्वी घरी आली आहे आणि तिच्या रूममध्ये आहे. जेव्हा मी तिच्या रुममध्ये गेले तेव्हा ती तिथे नव्हती आणि नंतर मी पाहिलं तर ती घरात येत होती. मी त्यावेळी तिला खोटं बोलताना रंगेहात पकडलं होतं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya bachchan says grand daughter navya navel is big liar know why mrj