आमिर खानचा मुलगा अभिनेता जुनैद खानचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लवयापा’ हा थिएटरमध्ये रिलीज होणारा त्याचा पहिला चित्रपट आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘महाराज’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. सध्या जुनैद त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुनैदने सांगितलं की त्याची लहान बहीण आयरा खानच्या लग्नात त्याला मोठा भाऊ असला तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्याला पार्ट्यांमध्ये जाणं आवडत नाही, त्यामुळे बहिणीच्या लग्नातही बाहेर वेळ घालवल्याचं जुनैदने नमूद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जुनैद म्हणाला की त्याला पार्ट्या करायला आवडत नाही. तो मोठ्या आवाजात वाजणारं म्युझिक व जास्त लोक असलेल्या पार्ट्यांना जाणं टाळतो. “माझ्या बहिणीच्या लग्नानंतर, माझे वडील मला म्हणाले, ‘तू जर लग्न करायचं ठरवलं असेल तर प्लीज पळून जा आणि लग्न कर’,” असं जुनैद हसत म्हणाला. आयराचं लग्न २०२४ मध्ये नुपूर शिखरेशी झाला. बहिणीच्या लग्नात त्याला कोणतीही जबाबदारी दिली नव्हती, तसेच त्याला कोणी सल्लादेखील विचारला नाही, असं जुनैदने सांगितलं.

जुनैद म्हणाला, “आयराला हे चांगलंच माहीत होतं की कोणीही जुनैदकडून काहीही अपेक्षा ठेवू नये, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये मी अजिबात तिची मदत करू शकत नाही. त्यामुळे कोणीही माझ्याशी काहीही चर्चा केली नाही. मला फक्त तारीख आणि वेळ सांगितली गेली आणि तिथे वेळेत पोहोचायला सांगितलं. त्यांचं म्हणणं असं होतं की मला काहीही काम सांगून फायदा नाही.” तो कौटुंबिक निर्णयांमध्ये भाग घेतो की तिथेही कुचकामी आहे? यावर जुनैद म्हणाला, “मी खरंच काहीच कामाचा नाही. ते मला सामील करून घेण्याचा खूप प्रयत्न करतात पण मी खूप कुचकामी आहे.”

जुनैद, आयरा व आझाद खान (फोटो – आयरा खान)

जुनैदने सांगितलं की तो पार्ट्यांमध्ये न जाता बाहेर बसणं पसंत करतो. तो म्हणाला, “आयराच्या लग्नातही मी बाहेरच होतो.” त्याने बाहेर आपला वेळ बाहेर कसा घालवला हे विचारल्यावर तो म्हणाला, “मी बाहेर काही लोकांसह, काही समविचारी लोकांबरोबर बसलो होतो.” वडिलांच्या घरी पार्टी असली तरी तो बाल्कनीत बसतो, असं जुनैदने सांगितलं.

दरम्यान, जुनैद खानचा दुसरा चित्रपट ‘लवयापा’ लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात खुशी कपूरदेखील आहे. याचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junaid khan says family thinks he is useless he sat outside at sister ira khan wedding hrc