amal Amrohi laid down 3 to 4 conditions for Meena Kumari: बॉलीवूड कलाकारांच्या चित्रपट, भूमिकांबाबत जितके बोलले जाते, तितकेच त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा होते. वर्षानुवर्षे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलले जाते.

अनेकदा कलाकारच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मनमोकळेपणाने बोलतात. दिग्दर्शक कमल अमरोही यांनीदेखील त्यांच्या मीना कुमारीबरोबरील गुंतागुंतीच्या नात्यावर वक्तव्य केले होते.

जेव्हा मीना कुमारी आणि कमल अमरोही एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यावेळी ते विवाहित होते. त्यांना मुले होती. मात्र, त्यांची पत्नी व मुले गावी असत आणि ते कामानिमित्त मुंबईत असत. मीना कुमारी आणि कमल आमरोही यांनी लग्न केले. त्यावेळी मीना कुमारी फक्त १८ वर्षांच्या होत्या; तर कमल अमरोही ३४ वर्षांचे होते.

रुक्सार अमरोही या कमल अमरोही व त्यांच्या पहिली पत्नी यांची मुलगी आहेत. २०१९ ला दिलेल्या मुलाखतीत रुक्सार यांनी वडील कमल व मीना कुमारी यांच्या नात्याबद्दल आणि ते वेगळे का झाले, याबद्दल वक्तव्य केले होते.

“त्या एका कवीच्या पत्नी…”

‘न्यूज १८ उर्दू’ला दिलेल्या मुलाखतीत रुक्सार म्हणालेल्या की, माझी आई आणि मीना कुमारी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. रुक्सार म्हणालेल्या, “माझे वडील मला म्हणालेले की, मी तुझ्या आईचा खूप आदर करतो. त्यांना त्यांच्या प्रेयसीने रोमँटिक आणि ग्लॅमरस दिसायला हवे होते. माझे वडील लेखक व कवी होते. त्यांच्या आदर्श मीनाजी होत्या. वडिलांना जशी प्रेयसी हवी होती, तशा मीनाजी होत्या. त्या एका कवीच्या पत्नी शोभतात, हे आमच्या संपूर्ण कुटुंबानं स्वीकारलं होतं. त्यासुद्धा प्रेमावर आधारित सुंदर ओळी लिहीत असत. माझी आई एका वेगळ्या वातावरणात वाढली होती.”

कमल अमरोही यांच्यावर मीना कुमारींना त्रास दिल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याबद्दल रुक्सार म्हणालेल्या, “मीना कुमारींनी हे आरोप केले नाहीत. त्या याबद्दल काहीच बोलल्या नाहीत. जे लोक दोन प्रेमात असलेल्या व्यक्तींना पाहू शकत नाही, अशा शत्रूंनी ते आरोप लावले होते. आपण अशा समाजात राहतो, जिथे दुसऱ्याचा आनंद इतरांना पाहवत नाही. काही लोकांना त्यांच्याबरोबर काम करायचे होते; पण माझ्या वडिलांनी काही बंधनं घातली होती.”

पुढे रुक्सार म्हणालेल्या, “माझ्या वडिलांना वाटायचं की, मीन कुमारींनी वेळेवर घरी आलं पाहिजे. त्यांनी मीना कुमारींना असंही सांगितलं होतं की मेकअप रूमचा दरवाजा फार वेळसाठी बंद ठेवायचा नाही. वडिलांनी त्यांना तीन-चार अटी घातल्या होत्या.

“मीनाजींनी माझ्या वडिलांना…”

त्यात एक अट अशीही होती की, जर त्या त्यांच्या किंवा इतर कोणाच्या गाडीतून कुठे जात असतील, तर गाडीतून त्यांनी परत आले पाहिजे. जर दुसऱ्या गाडीतून जाऊन येताना त्यांच्या गाडीतून आल्या, तर रिपोर्टर्स त्याबद्दल काहीतरी लिहितील. मीनाजींना माझ्या वडिलांविरुद्ध खूप भडकवले गेले होते. ते फक्त लिहीत होते, ते कोणाला सांगूही शकत नव्हते”, असे म्हणत रुक्सार यांनी कमल अमरोहींनी मीना कुमारींपुढे कोणत्या अटी ठेवल्या होत्या, याबद्दल वक्तव्य केले.

कमल अमरोही व मीना कुमारी हे वेगळे कधी झाले, याबद्दल रुक्सार म्हणालेल्या, “१९६४ ला मीना कुमारी अचानाक फिल्मीस्तान स्टुडिओमधून निघून गेल्या. त्या मेहबूब यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेल्या. मीनाजींनी माझ्या वडिलांना स्टुडिओमध्ये बोलावले होते; पण ते गेले नाहीत. कारण- त्यांना माहीत होते की, मीनाजी रागावल्या आहेत. जर ते त्या क्षणी गेले, तर गोंधळ निर्माण होईल. ते रात्री मेहबूब यांच्या घरी गेले. मीनाजींना समजावण्याचा प्रयत्न केला; पण मीनाजी परतल्या नाहीत.”

“ते पुन्हा तिला घ्यायला गेले नाहीत आणि त्या स्वतःहून परत आल्या नाहीत. त्यांचा राग शांत झाल्यानंतर मीनाजींनी वडिलांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये काहीही झाले तरी घटस्फोट घेऊ नये, अशी विनंती केली. दोघांनीही एकमेकांची काळजी घेण्याची शपथ घेतली होती,” असे म्हणत मीना कुमारी व कमल अमरोही वेगळे का झाले याबद्दल रुक्सार यांनी खुलासा केला होता.

दीर्घकाळ मद्यपान केल्यामुळे झालेल्या यकृताच्या आजाराने मीना कुमारी यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. कमल अमरोही यांचे १९९३ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.