बॉलीवूडची पंगा ‘क्वीन’ कंगना राणौतने ट्विटरवर पुनरागमन केले आहे. कंगनाला तिचे ट्वीटर अकाऊंट पुन्हा मिळाल्यानंतर तिने ट्वीटरचे नवीन सीईओ एलॉन मस्कचे यांच कौतुक केलं होतं. आता कंगनाने ट्वीटवर एक व्हिडीओ शेअर करत एलॉन मस्क यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा- ‘डॉन ३’ चित्रपटाबाबत फरहान अख्तरचा मोठा निर्णय; शाहरुख खान नाही तर ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

कंगनाला तिच्या बोलण्याचा फटका अनेकदा बसला आहे. कदाचित त्यामुळे ट्विटरनं तिचं अकाउंट बंद केलं होतं. दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगनानं यापूर्वी अनेकदा केल्याचे दिसून आले आहेत. यामुळेच की काय सोशल मीडियावरुन कंगनावर टीका होताना दिसते. आता तिनं ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्याबरोबर तिने स्वत:ची तुलना केली आहे.

कंगनानं ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने आपली तुलना एलॉन मस्क यांच्याबरोबर केली आहे. आपण आणि एलन मस्क सारखेच आहोत असे म्हणत ते आणि सणकीच आहोत. असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्हीच आम्हाला तुमचा आदर करण्यासाठी आणखी किती कारणं देणार आहात हे सांगाल का, यापूर्वी देखील कंगनानं एलन मस्क यांची स्तूती केल्याचे दिसून आले आहे. कंगनाच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा- “११ वर्ष डेटिंग आणि लग्नाच्या ३९ वर्षानंतर…” अनिल कपूर-सुनीता कपूर यांच्या नात्याला ५० वर्षे पूर्ण; अभिनेत्याने पत्नीसाठी लिहिले प्रेमपत्र, म्हणाले…

कंगनाचे अकाउंट ब्लॉक केल्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विटरची सुत्रं हाती घेताच कंगनाचं अकाउंट सुरु केलं होतं. त्यानंतर कंगनाच्या व्हायरल झालेल्या पोस्टवरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. कंगनानं आता ट्विटर हे बेस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले आहे.