एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि भाजपाबरोबर हातमिळवणी करत राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह याबद्दल लढाई सुरू होती. पण, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. अशातच या प्रकरणावर कंगना रणौतचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आता पुन्हा कधीच…” शिवसेना गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची सडकून टीका

कंगनाने एका युजरच्या ट्वीटला उत्तर देत केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. एका युजरने कंगनाचं दोन वर्षांपूर्वीचं ट्वीट शेअर करत ‘तिने आधीच याचा अंदाज वर्तवला होता. यामुळेच ती क्वीन आहे,’ असं म्हटलं होतं. त्या शेअर केलेल्या ट्वीटमध्ये ‘जो संतांची हत्या करतो आणि स्त्रियांचा अपमान करतो, त्याचा अंत होणं निश्चित आहे,’ असं कंगनाने दोन वर्षांपूर्वी म्हटलं होतं. त्या युजरचं ट्वीट रिट्वीट करत कंगना म्हणाली, ‘मी जे म्हटलं होतं, तो अंदाज नव्हता तर कॉमन सेन्स होता’ असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

कंगनाचं जुनं ट्वीट नेमकं काय?

कंगनाने दोन वर्षांपूर्वी केलेलं ट्वीट हे साधूंच्या हत्याकांडाबद्दल होतं. दरम्यान, कंगनाचं हे जुनं ट्वीट व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर कमेंट्स करत आहेत. कंगनाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut old tweet viral after uddhav thackeray lost shivsena name and symbol hrc