अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता हे बहुचर्चित कपल विवाहबंधनात अडकलं आहे. आज ४.३० वाजता अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यांचे चाहते या लग्नसोहळ्याचे आणि त्यांचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक होते. आता चाहत्यांना त्यांचे फोटो पाहता येणार आहेत. समाजमाध्यमांवर त्यांचे फोटो तसेच व्हिडीओ समोर आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा पार पडला. अगदी मोजक्याचा लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. विवाहसोहळा संपन्न होताच सुनील शेट्टीने लेकासह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिठाई वाटली.
“राहुल माझ्या भावासारखा…” बहिणीच्या लग्नानंतर अहान शेट्टीने दिली दाजींबाबत प्रतिक्रिया
व्हिडीओमध्ये दोघे छान दिसत आहे. राहुलने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर अथियाने पांढरे सिव्हल्स ब्लाउज आणि लेहंगा परिधान केला आहे. या नाव दाम्पत्याची जोडी शोभून दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कॉमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जोडी शोभून दिसत आहे म्हणणे आहे.
के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.