१९८० च्या दशकात अमिताभ बच्चन अभिनीत ‘कालिया’ आणि ‘शहेनशाह’ सारखे काही लोकप्रिय चित्रपट बनवणाऱ्या टिन्नू आनंद यांनी एकदा १९८९ मध्ये ‘शनाख्त’ नावाच्या चित्रपटासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांना साइन केले होते. हे दोन्ही कलाकार या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार होते. त्यावेळी बिग बी स्टार होते आणि माधुरीने नुकतंच ‘तेजाब’ आणि ‘राम लखन’मध्ये काम करून प्रसिद्धी मिळविली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता-दिग्दर्शक टिन्नू आनंद यांनी या चित्रपटाच्या शूटिंच्या पहिल्याच दिवशीची आठवण सांगितली. पहिल्याच दिवशी त्यांचा माधुरीशी तिच्या पोशाखावरून वाद झाला होता, ज्याचा शेवट खूपच वाईट झाला. तिने पडद्यावर ब्रा घालावी अशी त्याची इच्छा होती पण तिला ते पटले नाही आणि तिने नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा

‘रेडिओ नशा’शी बोलताना टिन्नू म्हणाले की ते जो पहिला सीन शूट करणार होते, त्यात अमिताभ यांना साखळीने बांधलं होतं. “सीनमध्ये अमिताभ यांना एका गाडीत खलनायकाने साखळीने बांधलं होतं. तरीही ते माधुरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. गुंड अमिताभ यांच्यावर हल्ला करत असतात, तेव्हा एक स्त्री तुमच्या समोर उभी असूनही तुम्ही एका पुरुषावर साखळीने का हल्ला करत आहात, असं माधुरीचं पात्र म्हणते” असं त्यांनी सांगितलं.

‘जवान’ला पहिल्या दिवशी मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला शाहरुख खान, ट्वीट करत म्हणाला, “मी एक-दोन दिवसात…”

टिन्नू आनंद यांनी सांगितलं की माधुरीला साइन करण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण सीक्वेन्स तिच्याशी शेअर केला होता. तिने कॅमेर्‍यासमोर तिच्या ब्लाउजचे बटण उघडून फक्त ब्रा घालून कॅमेर्‍यासमोर उभं राहायचं होतं. “मी संपूर्ण घटनाक्रम माधुरीला सांगितला होता आणि मी तिला सांगितलं होते की तुला तुझा ब्लाउज काढावा लागेल आणि पहिल्यांदा तू ब्रामध्ये दिसशील, मी गवताच्या ढिगाऱ्यामागे किंवा इतर कशाच्याही मागे तुला लपवणार नाही. कारण तुला मदत करण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या माणसाला मदत करण्‍यासाठी तू स्वतःला गुंडांना सोपवतेस. त्यामुळे ही खूप महत्त्वाची परिस्थिती आहे आणि मला पहिल्याच दिवशी या सीनचे शूट करायचे आहे. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणाली होती,” असं टिन्नू आनंद म्हणाले.

टिन्नू यांनी पुढे सांगितलं की त्यांनी माधुरीला तिची ब्रा स्वतःचं डिझाइन करायला सांगितली, पण ती ब्रा असावी आणि इतर कोणत्याही प्रकारचे कपडे नाही. “मी म्हणालो होतो की तू तुझी ब्रा डिझाईन करू शकतेस, तुला पाहिजे तशी. तू तुझी स्वतःची ब्रा डिझाईन करू शकतेस, मला हरकत नाही. पण ती ब्रा असायला हवी कारण तू तुझा ब्लाउज उघडशील आणि स्वतःला अर्पण करत असशील,” असं त्यांनी नमूद केलं.

अखेर शूटिंगचा दिवस उजाडला आणि टिन्नू सेटवर माधुरीच्या येण्याची वाट पाहत होते. जेव्हा ती ४५ मिनिटं तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही, तेव्हा ते तपासण्यासाठी आत गेले आणि त्यांना कळलं की तिने अद्याप तयार होण्यास सुरुवात केली नाही. “मी विचारलं काय झालं? ती म्हणाली, ‘टिनू, मला हा सीन करायचा नाही.’ मी म्हणालो, ‘सॉरी, पण तुला हा सीन करावाच लागेल.’ ती म्हणाली, ‘नाही, मला करायचा नाही.’ मी म्हटलं, ‘ठीक आहे, पॅक अप कर आणि चित्रपटाला अलविदा म्हण. मी माझे शूट कॅन्सल करेन.”

कसा आहे शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…

त्यानंतर अमिताभ बच्चन सेटवर आले आणि काय चाललं आहे असं विचारलं. त्यावर टिन्नू आनंद यांनी माधुरी दीक्षितबरोबर वाद झाल्याचं सांगितलं. अमिताभ यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. “अमिताभ म्हणाले, ‘असू दे, तू तिच्याशी का भांडत आहेस? तिला आक्षेप असेल तर…’ मी म्हणालो, ‘तिला आक्षेप घ्यायचाच होता, तर तिने चित्रपट साइन करण्यापूर्वी घ्यायला हवा होता.’”

टिन्नू यांनी सांगितलं की त्यांनी लगेचच माधुरीच्या जागी चित्रपटात इतर अभिनेत्रीला घेण्याचा विचार करायला सुरुवात केली पण तेवढ्यात माधुरीची सेक्रेटरी आली आणि तिने आश्वासन दिलं की ती शेवटी सहमत होईल. चित्रपटाचे शुटिंग फक्त पाच दिवस झाले होते आणि टिन्नू आनंद यांच्या म्हणण्यानुसार, मनमोहन देसाई यांनी चित्रपट पाहून कौतुक केलं होतं. दरम्यान, त्यानंतर माधुरी आणि टिन्नू यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit was asked to wear just a bra on screen front of amitabh bachchan tinnu anand fired after she refused hrc