दोन दशकापूर्वीच्या सुपरहिट गदर ‘एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिनिलीया देशमुखला आवडतात ‘हे’ महाराष्ट्रीय पदार्थ; म्हणाली, “सासूबाई दर गुरुवारी…”
‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आता २२ वर्षांनंतर, निर्मात्यांनी ‘गदर: एक प्रेम कथा’ थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या निर्मिती कंपनीने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. ‘गदर २: द कथा कंटिन्यू’पूर्वी ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज होणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे तो २००१ मध्ये ज्या तारखेला रिलीज झाला होता, त्याच तारखेला पुन्हा रिलीज होणार आहे.
निर्मात्यांनी ‘गदर २’ च्या आधी ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून प्रेक्षकांना संपूर्ण कथा पुन्हा एकदा पाहता येईल आणि समजून घेता येईल. निर्मात्यांनी १५ जून २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना ‘गदर’ आणि ‘गदर २’ चित्रपट काही महिन्यांच्या अंतराने थिएटरमध्ये पाहता येणार आहेत.
राखी सावंतने लग्नाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर सोडलं मौन; सत्य सांगत म्हणाली, “मी खूप…”
‘गदर २’चं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार असलेला उत्कर्ष ‘गदर २’मध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.