Malaika Arora Video : मलायका अरोरा तिच्या सिनेविश्वातील कामासह खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका नेहमी सुंदर आणि हटके आउटफीट परिधान करते. अनेक तरुणी तिचा फॅशन सेन्स फॉलो करतात. सोशल मीडियावर सध्या मलायका अरोराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायकासोबत एक घटना घडली आहे. या घटनेमुळे चाहते आता तिच्याबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मलायका तिच्या एका ओळखीच्या मित्रासह रात्री फिरायला बाहेर पडली आहे. त्यादरम्यान रस्त्त्यावर चालता चालता अचानक तिचा पाय घसरतो आणि तोल जातो. मात्र, मित्राचा हात पकडलेला असल्याने ती खाली पडत नाही. त्यानंतर मलायका मित्राबरोबर पुढे निघून जाते.

हेही वाचा : सागर बहिणीसाठी नवरा विकत घेणार? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा नवीन प्रोमो

सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर काही मजेशीर कमेंट्स केल्यात. तसेच काहींनी मलायकाला ट्रोलसुद्धा केलं आहे. “मलायका दारूच्या नशेत असल्यानं अशी चालत आहे”, असंही एकानं कमेंटमध्ये लिहिलं आहे. आणखी एकानं, “मलायका ब्रेकअपनंतर दुसऱ्या मित्राबरोबर फिरत आहे”, असं म्हटलंय. कायम स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या मलायकानं यावेळीदेखील हटके आउटफिट परिधान केलं आहे. अभिनेत्रीने ग्रे रंगाची पँट आणि बॅकलेस ऑफशोल्डर पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.

काही दिवसांपूर्वीच मलायकानं इन्स्टाग्रामवर आरोग्याशी संबंधित एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यात तिनं, “ऊन, पाणी, सात्त्विक जेवण, आराम, हवा, हास्य व व्यायाम हे सात डॉक्टर आपल्या आरोग्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आणि फायदेशीर आहेत”, असं लिहिलं होतं. दारूचं जास्त सेवन केल्यानं मलायकाचा तोल जात असल्याचं पाहून काही नेटकऱ्यांनी तिनं इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फिटनेस स्टोरीची आठवण तिला करून दिली आहे.

हेही वाचा : प्रशांत दामलेंचं नवीन नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला! सोबतीला झळकणार हृषिकेश शेलारसह ‘हे’ कलाकार

मलायका अरोरा सध्या ५१ वर्षांची आहे; तर अर्जुन कपूर ३९ वर्षांचा आहे. वयामध्ये मोठं अंतर असूनदेखील या दोघांनी बरीच वर्षं एकमेकांना डेट केलं. मात्र, आता त्यांच्या नात्यातील दरी वाढत चालली आहे. तसेच दोघांचं नातं संपल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांचं नातं संपल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालं होतं. कारण- अर्जुननं एका मुलाखतीमध्ये मी आता सिंगल असल्याचं सांगितलं होतं. त्यात मलायकाचा दुसऱ्या मित्राबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानं, ती नवीन आयुष्याच्या वाटेवर चालली आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora viral video she loses her balance fell as steps out see video rsj