मनीषा कोईराला ९० च्या दशकातील बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. मनीषाच्या अफेअरचे किस्से मनोरंजनसृष्टीत प्रसिद्ध आहेत. तिने २०१० मध्ये नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहलशी लग्नगाठ बांधली होती. त्यांचा प्रेमविवाह होता, पण लग्न फार काळ टिकलं नाही. अवघ्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. २०१२ मध्ये पतीपासून विभक्त झाल्यानंतर मनीषा एकटीच आयुष्य जगत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी स्त्रियांचा फक्त सेक्ससाठी वापर करतो”, राम गोपाल वर्मांनी ‘त्या’ प्रश्नावर अभिनेत्रीला दिलेलं उत्तर

दुसऱ्यांदा लग्न करण्याबाबत मनीषाने भाष्य केलं आहे. “दुसऱ्यांदा लग्न करण्याची वेळ निघून गेली आहे, नाही का? कधी कधी मला वाटतं की माझा जोडीदार असता तर आयुष्य आतापेक्षा चांगलं असतं का? मला माहीत नाही. पण मला माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं. माझी मुलं म्हणजे माझे कुत्रा आणि मांजर आहेत, त्यांची नावं मोगली आणि सिम्बा आहेत. शिवाय माझे आई-वडील आणि खूप प्रेमळ मित्र आहेत. तरीही, कधी कधी मला प्रश्न पडतो की जर मला जोडीदार मिळाला असता तर आयुष्य आतापेक्षा चांगलं असतं का?” असं मनीषा म्हणाली.

“अर्जुन कपूरचं करिअर संपलंय,” बॉलीवूड अभिनेत्याची टीका; म्हणाला, “तो घरात बसून मलायकाची…”

पुढे ती म्हणाली, “मला माहीत आहे की या जगात मुलाचे संगोपन करणं खूप जबाबदारीचं काम आहे. ज्या दिवशी मला खात्री पटेल की मी एकटी आई म्हणून मुलाची जबाबदारी पार पाडू शकते, तेव्हा मी ती जबाबदारी घेईन. सध्या मी माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि ज्या गोष्टी मला करायच्या आहेत, त्या मी करत आहे. मी या गोष्टींचा आनंद घेत आहे. जर मी या सर्व गोष्टी सोडून फक्त पालक होण्यावर लक्ष केंद्रित करू शकले तर मला ते करायला आवडेल.”

दरम्यान, मनीषाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘शहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यनच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती इतरही काही प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manisha koirala talks about second marriage after divorced with samrat dahal years back hrc