बॉलीवूड अभिनेता व चित्रपट निर्माता जॅकी भगनानी व अभिनेत्री रकुल प्रीत सिंग लग्नबंधनात अडकणार आहेत. गोव्यात २१ फेब्रुवारी रोजी त्यांचं लग्न होईल. लग्नसोहळ्यासाठी जॅकी व रकुलसह त्यांचे कुटुंबिय गोव्यात पोहोचले आहेत. त्यानंतर आता पाहुणेही गोव्यात पोहोचत आहेत. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखदेखील लग्नासाठी गोव्यात पोहोचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॅकी हा धिरज देशमुखांचा मेहुणा आहे. मेहुण्याच्या लग्नासाठी धिरज गोव्यला गेले आहेत. त्यांचा गोव्यातील एअरपोर्टवरून एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ते तिथं उभ्या असलेल्या पापाराझींना नमस्कार करतात आणि त्यांनी चहा-नाश्ता घेतला की नाही, याबद्दल विचारपूस करतात आणि निघून जातात. ‘वूम्प्ला’ने त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

दरम्यान, जॅकी भगनानी वाशू भगनानी व पूजा भगनानी यांचा मुलगा आहे. जॅकीला एक मोठी बहीण असून ती देशमुखांची सून आहे. दीपशिखा ही लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांची पत्नी आहे. जॅकी व दीपशिखा हे दोघेही सख्खे बहीण-भाऊ आहेत.

जॅकी भगनानीपेक्षा श्रीमंत आहे रकुल प्रीत सिंग, किती आहे दोघांची संपत्ती? जाणून घ्या

मेहुण्याच्या लग्नासाठी धिरज देशमुख गोव्यात पोहोचले आहेत. गोव्यात लग्नाआधीच्या विधींना लवकरच सुरुवात होणार आहे. रकुल व जॅकीचं लग्न अवघ्या दोन दिवसांवर आहे. हे जोडपं आधी परदेशात लग्न करणार होतं, पण नंतर त्यांनी निर्णय बदलला आणि आता ते गोव्यात विवाहबंधनात अडकतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla dhiraj deshmukh reached goa for jackky bhagnani rakul preet singh wedding video viral hrc