Moushumi Chatterjee Recalls Rivalry With Rekha: समकालीन कलाकारांमध्ये अनेकदा स्पर्धा असल्याचे दिसते. काही वेळा त्यामधून वाद होतानाही दिसतात. अनेकदा कलाकार त्यावर उघडपणे वक्तव्य करतात. आता दिग्गज अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी रेखा यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.

रेखा व मौसमी चॅटर्जी यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘मांग भरो सजना’, ‘दिलदार’, ‘प्रेमबंधन’, ‘दासी’, अशा चित्रपटांत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, रेखा व मौसमी यांच्यामध्ये स्पर्धा होती. मौसमी चॅटर्जी यांनी एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.

त्याच्या आईबरोबरदेखील माझे…

मौसमी चॅटर्जी यांनी ‘फिल्मफेअर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “मी विनोद मेहराच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवत आहे, असे रेखाला वाटायचे. कारण- मी विनोदच्या घरी असायचे. त्याच्या आईबरोबरदेखील माझे चांगले नाते होते. त्याची आई मला म्हणायची की, इंदू विनोदच्या कपाटातील तो लिफाफा मला दे. त्यामुळे रेखाला हे सगळे आवडायचे नाही. रेखा असा विचार करायची की, इतर कोणाहीपेक्षा रेखा मौसमीचे जास्त ऐकतो.”

मौसमी यांनी असाही दावा केला, “रेखा मला पाहून वेडेवाकडे तोंड करायची. तिला फरक पडत नसल्यासारखी वागायची. एकदा मी तिला म्हणाले की, परत एकदा कर. तू हे सर्व कसं करतेस. त्यावेळी ती घाबरली. आता रेखाला हे आठवतं की नाही ते मला माहीत नाही.”

प्रेमबंधन या चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगताना मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “रामानंद सागर यांनी मला माझी हीलची चप्पल काढण्यास सांगितले. कारण- रेखाने चप्पल घातली नव्हती. मी त्यांना म्हणाले की, सुशिक्षित श्रीमंत मुलगी आहे. मला तसेच वाढवले गेले आहे. मला का चप्पल काढण्यास सांगत आहात. रेखाला पायाखाली स्टूल घ्यायला सांगा.”

दासी या चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगत मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “रेखा सतत दुय्यम भूमिका करून कंटाळली होती. त्यामुळे तिने राज खोसला यांना विनंती केली की, मला ‘दासी’ची भूमिका करू द्या. मी संजीव कुमार यांची पत्नी बनेन. मौसमीला दुसरी भूमिका करू द्या. मला आठवतं की, , तिच्या या बोलण्यावर सगळे हसत होते. त्यावर राज खोसला म्हणाले की, मला त्यासाठी पूर्ण स्क्रिप्ट बदलावी लागेल.