‘रामायणा’वर आधारित असलेल्या ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संवाद, व्हिएफएक्स आणि रावणाच्या लूकमुळे या चित्रपटावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. ‘शक्तिमान’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनीही आदिपुरुषमधील रावणाच्या पात्रावर टीका केली होती. आता त्यांनी ‘आदिपुरुष’च्या टीमबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘आदिपुरुष’ चित्रपटावर पुन्हा टीका केली आहे. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटातील संवादावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने रामायण वाचलचं नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा>> “रामायण हे मनोरंजनासाठी नाही”, सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलीया यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “आदिपुरुष…”

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “महादेवाने रावणाला आशीर्वाद दिला होता. लोकांना याबद्दल जास्त माहीत नाही. अशावेळी तुम्ही अशा गोष्टी दाखवत आहात. हे मुर्खपणाचं आहे. त्यांना माफ केलं जाऊ शकत नाही. ‘आदिपुरुष’च्या टीमला ५० डिग्री सेल्सिअस तापमानात उभं करुन जाळलं पाहिजे, हे मी माझ्या व्हिडीओतही म्हटलं आहे.”

‘आदिपुरुष’चे लेखक मुकेश मुंतशीर व दिग्दर्शक ओम राऊतही यांच्यावरही मुकेश खन्ना यांनी टीका केली आहे. “एवढं सगळं घडल्यानंतर ते चेहरा लपवतील, असं मला वाटलं होतं. पण, ते पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण देत आहेत. सनातन धर्मासाठी आम्ही हे बनवलं असल्याचा दावा ते करत आहेत. पण, तुमचा सनातन धर्म आमच्यापेक्षा वेगळा आहे का?” असंही पुढे ते म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh khanna controversial statement said adipurush team should burnt alive in 50 degree celsius kak