scorecardresearch

आदिपुरुष

आदिपुरुष (Adipurush) हा रामायण महाकाव्यावर आधारित एक सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. दिग्दर्शनासह त्यांनी या सिनेमाची पटकथा देखील लिहिली होती. या चित्रपटाचे संवाद मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. टी-सीरीज आणि रेट्रोफिल्स यांनी मिळून आदिपुरुष सिनेमाची निर्मिती केली आहे.


अजय-अतुल या संगीतकार जोडीने आदिपुरुषच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली होती. या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली. प्रभास प्रभू रामचंद्राच्या भूमिकेमध्ये दिसणार या घोषणेने एकूण सर्व चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या. या चित्रपटावर एकूण ५०० ते ७०० कोटी रुपये इतका खर्च झाला आहे अशा माहितीमुळे चाहत्यांना चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या. पुढे चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला. यासाठी अयोद्धा नगरीमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पण प्रभासचा लूक आणि एकूणच वाईट व्हीएफएक्समुळे कोणालाच टीझर फारसा आवडला नाही.


पुढे म्युझिक लॉन्चच्या वेळी अजय-अतुलच्या संगीतामुळे हा सिनेमा हिट होणार असे काहीजणांना वाटले. पण चित्रपटाचा मुख्य ट्रेलर लॉन्च केल्यानंतर सर्वांची निराशा झाली. एकूणच सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सर्वांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर ट्रोलिंग पाहता सिनेमामध्ये बदल करण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. पण असे करुनही व्हीएफएक्ससह अन्य तांत्रिक बाबींमध्ये त्यांनी फारशी मेहनत न घेतल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली. पुढे सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच संवादांसह विविध सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. सुरुवातीला फक्त सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग वाढायला लागलं. हा चित्रपट तयार करुन निर्मात्यांनी विशेषत दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी हिंदू देवतांचा अपमान केला आहे असे लोक म्हणू लागले.


ठिकठिकाणी वाद पेटला. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरुनही चित्रपटाला विरोधाला सामोरे जावे लागले. परिस्थिती पाहता निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या मागणीनुसार संवाद बदलले, काही दृष्ये चित्रपटातून काढून टाकली. फक्त प्रेक्षकांनीच नाही तर समीक्षकांनीही आदिपुरुषवर टिका केली. हा प्रभाससाठी फार वाईट काळ ठरला. बाहुबलीनंतर त्याचे सलग २ चित्रपट फ्लॉप झाले होते. बाहुबलीमुळे तयार झालेली त्याची भव्य प्रतिमा आदिपुरुषमुळे प्रचंड खराब झाली.


Read More
Saif Ali Khan opened up adipurush controversies adipurush box office prabhas kriti sanon
‘आदिपुरुष’च्या अपयशाबाबत सैफ अली खानने पहिल्यांदाचे सोडले मौन; म्हणाला, “मी स्वत:ला कधीच…”

६०० कोटी बजेट असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

Manoj Muntashir talk about Adipurush Failure
15 Photos
“प्रभू रामाची बदनामी…”, ‘आदिपुरुष’बद्दल बोलताना लेखकाचं विधान; म्हणाला, “वादानंतर मला हिंदूंचा…”

“ती माझी सर्वात मोठी चूक होती,” चित्रपटाच्या वादाबद्दल मनोज मुंतशिरचं वक्तव्य

Manoj Muntashir accepted mistake about Adipurush says I went totally wrong
“मी १०० टक्के चुकलो”, ‘आदिपुरुष’च्या लेखकाची अखेर कबुली; म्हणाला, “या चित्रपटासाठी ६०० कोटी…”

“असा चित्रपट करून आपलं करिअर कोणाला संपवायचं आहे?” आदिपुरुषच्या लेखकाचं विधान चर्चेत

Gashmeer Mahajani pn adipurush
पृथ्वीवरून कोणती गोष्ट डिलीट करायला आवडेल? गश्मीर महाजनीने घेतलं प्रसिद्ध अभिनेत्याच्या ‘या’ सिनेमाचं नाव

गश्मीर महाजनीने नुकत्याच आलेल्या एका चित्रपटाचं घेतलं नाव, तो चित्रपट कोणता? वाचा

adipurush-ott
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘आदिपुरुष’ अखेर OTT प्लॅटफॉर्मवर झाला उपलब्ध; वाचा कुठे पाहता येणार?

चित्रपटामुळे निर्माण झालेला वाद पाहता प्रथम कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट घेण्यास तयार नव्हता असं वृत्त समोर आलं होतं

Vatsal Sheth addresses Adipurush failure says my close relatives did not go and watch
“प्रचंड नकारात्मकता…”, ‘इंद्रजीत’ फेम अभिनेत्याने ‘आदिपुरुष’च्या अपयशाबद्दल मांडले स्पष्ट मत; म्हणाला, “माझे नातेवाईक…”

‘आदिपुरुष’च्या अपयशाबद्दल ‘इंद्रजीत’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मांडले स्पष्ट मत, म्हणाला…

aadipurush
‘आदिपुरुष’ची ओटीटी प्रदर्शनाची तारीख पक्की; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार?

‘आदिपुरुष’ लवकरच होणार ओटीटवर प्रदर्शित . नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

adipurush-taranadarsh
“असे चित्रपट फ्लॉप होणं…” चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांची ‘आदिपुरुष’वर जोरदार टीका

‘पठाण’नंतर बॉलिवूड पुन्हा आयसीयुमध्ये गेलं असंही तरण आदर्श यांनी म्हंटलं आहे

Adipurush full movie leaked on YouTube
‘आदिपुरुष’ चित्रपट YouTube वर झाला लीक, काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट युट्यूबवर एचडी क्वालिटीमध्ये लीक करण्यात आला.

actor Lavi Pajni
‘आदिपुरुष’मधील कुंभकर्ण दररोज २० पोळ्या, २५ अंडी व १ किलो खायचा चिकन, कोण आहे ‘हा’ अभिनेता जाणून घ्या

‘आदिपुरुष’ चित्रपटात कुंभकर्ण भूमिका साकारण्यासाठी ‘या’ अभिनेत्यानं ‘इतकं’ वाढवलं होतं वजन

Manoj Muntashir extends apology
‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी जनतेची मागितली जाहीर माफी; म्हणाले, “मी हात जोडून…”

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत जनतेची मागितली माफी

संबंधित बातम्या