ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांत नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरूनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच ‘Tried and refused productions’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील अनुभवाबद्दल भाष्य केलं. तसंच या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या उर्दू भाषेवरील प्रेमाचाही उल्लेख निघाला. याच मुलाखतीमध्ये उर्दू ही भाषात काशी तयार झाली याबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “उर्दू ही केवळ भारतातच बोलली जाते…” नसीरुद्दिन शाह यांचं मोठं विधान

उर्दू भाषा हे भारतातील वेगवेगळ्या भाषांपासून अस्तित्वात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबरोबरच मराठी भाषेतील बरेच शब्द हे फारसी भाषेतून आलेले आहेत, आणि हे शब्द मराठी म्हणून प्रचलित झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अगदी वेगवेगळी उदाहरणं देऊन नसीरुद्दीन यांनी ही गोष्ट सांगितली.

नसीरुद्दीन म्हणाले, “बऱ्याच मराठी भाषिक लोकांना हे ठाऊक नाहीये की मराठीतही बरेच फारसी शब्द आहेत ज्यांचा सर्रास वापर केला जातो. ‘आरसा’ हा फारसी शब्द आहे. ‘जकातनाका’मधील ‘जकात’ हा फारसी शब्द आहे. ‘फकत’मधून तयार झाला ‘फक्त’ हा शब्ददेखील फारसी आहे. असे बरेच शब्द आहेत जे आज मराठी भाषेचा हिस्सा बनले आहेत पण त्यांचं मूळ हे फारसी भाषेशी आहे. त्याकाळात फारसी भाषा ही सामान्य लोकसुद्धा बोलायचे, इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनाही फारसी भाषा अवगत होती.”

या व्हिडीओमुळे नसीरुद्दीन शाह पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांची आगामी वेब सीरिज ‘ताज’ ही तुम्हाला ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah speaks about marathi words connection with persian language avn
First published on: 05-06-2023 at 18:44 IST