चित्रपटसृष्टीत अभिनेत्यांनी वजन वाढवणं आणि कमी करणं हे आता नवीन राहिलेलं नाही. चित्रपटातील भूमिकेसाठी नट त्यांच्या शरीरावर असे वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला आढळतात. कलाकारांच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओ फोटोज आपण पाहिले असतील. आमिर खानने ‘दंगल’साठी, अतुल कुलकर्णीने ‘नटरंग’साठी घेतलेली मेहनत आपण पहिली असेलच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याने असंच ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. अभिनेता नील नितीन मुकेश याने नुकतंच या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटोज सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे कोणत्याही चित्रपटासाठी नसून तर हे ट्रान्सफॉर्मेशन स्वतःसाठी असल्याचं नीलने स्पष्ट केलं आहे. २०२२ मधील फोटो आणि २०२३ च्या पहिल्याच दिवशी काढलेले फोटो या दोघांची तुलना करून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा : “मला स्टेजवरुन हाकलवलं…” स्टँड अप कॉमेडीयन झाकीर खानने सांगितला ‘तो’ किस्सा

यासाठी त्याने त्याच्या घरच्यांना धन्यवाद दिले आहेत. २०२२ मध्ये पोट सुटलेला नील आणि २०२३ मध्ये एकदम फिट नील यामधला हा फरक त्याच्या चाहत्यांनाही भलताच आवडला आहे. इतकंच नाही तर कित्येकांनी त्याच्या या मेहनतीवर प्रश्नचिन्हसुद्धा उभं केलं. याबद्दलही नीलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. २०२२ ते २०२३ दरम्यान ही मेहनत घेताना नीलच्या परिवाराने त्याला खूप सहकार्य केलं त्यामुळे त्याने त्यांचे आभार मानले आहेत.

नील लवकरच तमन्ना भाटीयाबरोबर एका तामीळ चित्रपटात झळकणार आहे. श्रीराम राघवन यांच्या ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटातून नीलने पदार्पण केलं. याबरोबरच त्याने ‘७ खून माफ’, ‘वजीर’, ‘न्यू यॉर्क’सारख्या चित्रपटातही काम केलं आहे. नीलच्या या जबरदस्त फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनची सध्या चांगलीच चर्चा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neil nitin mukesh shares a special new year post showing his physical transformation avn