Amitabh Bachchan Trolled Operation Sindoor : २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या ‘ऑपरेशन सिंदूर’चं नागरिक, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी स्वागत करत आहेत. भारतीय सैन्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. पण याचदरम्यान, महानायक अमिताभ बच्चन ट्रोल होत आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ च्या मुद्द्यावर बिग बींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यांनी काही ब्लँक पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट पाहून युजर्स अमिताभ बच्चन यांच्यावर संतापले आहेत आणि आता ते बिग बींना या पोस्टचा अर्थ विचारत आहेत.

अमिताभ बच्चन झाले ट्रोल

७ मे रोजी अनेक दाक्षिणात्य व बॉलीवूड स्टार्सनी सोशल मीडियावर ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पोस्ट केल्या. भारतीय सैन्याचं कौतुक केलं, पण अमिताभ बच्चन यांनी विचित्र पोस्ट केल्या आहेत. बिग बींनी मंगळवारी रात्री १ वाजता आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केली होती. त्यात फक्त टी 5371- असं लिहिलं होतं. त्यानंतर बुधवारी रात्री १.३५ पोस्ट केली त्यात टी 5372- लिहिलं होतं. या पोस्टमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख नव्हता आणि काही मेसेजही नव्हता.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

सोशल मीडियावर लोकांनी बिग बींना ट्रोल करायला सुरुवात केली. एका युजरने कमेंट केली, “प्लीज एक्सप्लेन (तुमच्या पोस्टचं स्पष्टीकरण द्या)”. दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “ही मूक ड्रिल कधी संपेल?” आणखी एक युजर म्हणाला “सर, कृपया फक्त ऑपरेशन सिंदूर तरी लिहा.”

नेटकऱ्यांच्या कमेंट्स
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

पहलगाम हल्ल्याबद्दल केली नव्हती पोस्ट

अमिताभ बच्चन यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल पोस्ट केली नव्हती. तेव्हाही त्यांनी अशाच क्रिप्टिक पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्टमध्ये त्यांनी फक्त नंबर लिहिले होते. तेव्हाही त्यांच्या पोस्ट पाहून युजर्स अमिताभ बच्चन यांना अर्थ विचारत होते.