अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसह व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची स्टारकास्ट चांगलीच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानला डेट करण्याच्या चर्चांवर पूजा हेगडेने सोडलं मौन; म्हणाली…

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, श्वेता तिवारीची लेक व अभिनेत्री पलक तिवारीने सलमानच्या चित्रपटाच्या सेटवर मुलींच्या कपड्यांबद्दल एक नियम असल्याचं म्हटलं होतं. आता तिने त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. सलमान खानच्या चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचं शरीर नीट झाकलं जाईल, असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने म्हटलं होतं. आता तिच्या वक्तव्याबद्दल तिने स्पष्टीकरण देत त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं म्हटलं आहे.

सलमान खानच्या चित्रपटांच्या सेटवर मुलींसाठी आहे ‘हा’ विशेष नियम; पलक तिवारीने केला खुलासा

पलकने आपल्या ताज्या मुलाखतीत म्हटलं, “खरोखरच माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढण्यात आला आहे. मला इतकंच सांगायचं होतं की मी माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या लोकांबरोबर काम करत असताना कोणते कपडे घालावेत, याबद्दल स्वतःसाठी काही गाइडलाइन्स ठरवल्या आहेत. ज्यांचा आदर्श घेऊन मी मोठी झाले, त्यापैकीच एक सलमान सर आहेत.”

काय म्हणाली होती पलक तिवारी?

पलक म्हणालेली, “सलमान सर खूप पारंपरिक आहेत. मुलींनी जे योग्य वाटेल ते कपडे परिधान करावे, असं ते म्हणतात. पण मुली सुरक्षित असाव्या, हा त्यांचा हेतू असतो. सेटवर बरेच अनोळखी पुरुष वावरत असतात, त्यामुळे प्रत्येकावर पूर्ण विश्वास टाकणं त्यांना जमत नाही. त्यामुळे सेटवरील मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हा नियम केला आहे.”

दरम्यान, सलमानबरोबर काम करायची पलकची ही पहिली वेळ नाही. याआधी आलेल्या ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ या चित्रपटामध्ये पलकने सहाय्यक म्हणून काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palak tiwari clarifies her comment on salman khan strict dress code barring women on movie set hrc