बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान विविध कारणांनी चर्चेत येत असतो. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची हवा आहे. त्याचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या काही तासातच लाखो लोकांनी हा ट्रेलर पहिला आहे. जॉन अब्राहम या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे असं दिसून येतंय. शाहरुख सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे जॉनने चित्रपटाबद्दल भाष्य करण्यास नकार दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील एक कार्यक्रमात त्यानेज हजेरी लावली होती. त्यावेळी पत्रकार परिषददेखील आयोजित केली होती. याच पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने पठाण चित्रपटाबद्दल प्रश्न विचारताच त्याने दुर्लक्ष करून पत्रकार परिषदेतून काढत पाय घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

पठाण’साठी किती फी घेतलीस? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान म्हणाला…

जॉनला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. एकाने लिहले आहे “बहुतेक याला श्रेय दिले नसेल” दुसऱ्याने लिहले आहे “याला माहित असेल चित्रपट बॉयकॉट होणार आहे.” आणखीन एकाने लिहले आहे “त्याची कृती अत्यंत चुकीची आहे.” अशा प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान शाहरुख जॉन या चित्रपटात आमनेसामने आले आहेत. दीपिकाचा बोल्ड अंदाज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathaan actor john abraham trolled after asking question about film spg