अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात केला. त्यानंतर यामीने त्यांचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी ऐकलंय की या आठवड्यात ‘आर्टिकल ३७०’ वर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कसा आहे याबद्दल मला माहीत नाही. पण मी या चित्रपटाबद्दल नुकतंच ऐकलंय. ही चांगली गोष्ट आहे, कारण लोकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.”

“मी नितीश भारद्वाज यांची…”, ‘महाभारत’ फेम ‘कृष्णा’च्या सर्व आरोपांवर IAS पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझ्या जुळ्या मुली…”

यामी गौतमने व्यक्त केला आनंद

“पंतप्रधान मोदींना आमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल बोलताना ऐकणं हा मोठा सन्मान आहे. माझी टीम आणि मला आशा आहे की ही अविश्वसनीय कथा पडद्यावर आणण्यात आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू,” असं यामीने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं.

दरम्यान, हा चित्रपट २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामीची मुख्य भूमिका आहे. यामीच्या या चित्रपटात काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची कथा दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट काश्मीरमध्ये प्रदर्शित होणार नाही, याबाबत दिग्दर्शक आदित्य धर यांना विचारलं असता ते म्हणाले, “आम्ही हा चित्रपट काश्मीरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. पण आता आम्ही लवकरच पालक होणार आहोत. त्यामुळे आम्ही चित्रपट फक्त जवळच्या ठिकाणी प्रदर्शित करत आहोत कारण यामी जास्त प्रवास करू शकत नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi praised yami gautam article 370 movie based on real story jammu kashmir hrc