Poonam Pandey In Mahakumbh : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने प्रयागराज भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. ती सध्या सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली आहे, तिने गंगेत स्नान केले असून महाकुंभमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम स्टोरीवर पूनमने हात जोडून प्रार्थना करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असल्याचे दिसते. मंगळवारी (२८ जानेवारी २०२५) तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती वाहतूक कोंडीत अडकलेली दिसली. बुधवारी पहाटे महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना पूनम म्हणाली, “हे खूप दुर्दैवी आहे.” तिने पुढे लिहिले, “शक्ती भलेही कमी होऊ शकते, पण श्रद्धा कमी होऊ नये. ॐ नमः शिवाय!” पूनमने गंगेत स्नान करतानाचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून तिने त्यावर तिची सगळी पाप धुतली गेली असे कॅप्शन दिले आहे.

महाकुंभमध्ये मौनी अमावास्येच्या पवित्र स्नानासाठी लाखो भाविक दाखल झाल्याने बुधवारी पहाटे संगमावर चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री २ वाजताच्या सुमारास, कुंभ मेळा क्षेत्रात भरणाऱ्या मंत्रोच्चार आणि श्लोकांच्या आवाजात, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांचे सायरन घुमू लागले.या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना मेळा क्षेत्रातील केंद्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जखमींच्या नातेवाईकांसह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनुसार, या घटनेत अनेक जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर अख्याांनी माघ अमावास्येच्या पारंपरिक अमृतस्नानाचा कार्यक्रम रद्द केला. मात्र, मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी संगम आणि इतर घाटांवर स्नान सुरूच ठेवले. महाकुंभ मेळा १३ जानेवारी २०२५ पासून सुरू झाला असून तो २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

पूनमने गंगेत स्नान करतानाचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून तिने त्यावर तिची सगळी पाप धुतली गेली असे कॅप्शन दिले आहे. (Photo – Poonam Panday Instagram)

या महाकुंभमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यात अनुपम खेर, रेमो डिसूझा, ममता कुलकर्णी, गुरू रंधावा, शंकर महादेवन, कैलाश खेर यांच्यासह अनेक दिग्गजांनी गंगेत पवित्र स्नान केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam pandey takes holy dip in ganga river at maha kumbh reacts on stampede incident psg