Prateik Babbar says I could’ve been Farhan Akhtars Stepbrother: बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. चित्रपट, सोशल मीडिया तसेच मुलाखतींमध्ये केलेली वक्तव्ये यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात.

७० च्या दशकात दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी यांच्यात अनेकदा पडद्यावर स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र, त्यांचं एकमेकांना फार कौतुक होतं. त्यांच्यात प्रेम होतं, ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने यावर पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे.

…तर आज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असतो

प्रतीक बब्बरने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रतीक म्हणाला, “मला अलीकडच्या काळात समजले की माझ्या आईच्या निधनानंतर शबानाजी आणि जावेद साहेब यांना मला दत्तक घेण्याची इच्छा होती. पण, ते थोडे गुंतागुंतीचे होते.ठ

ठआज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असतो. पण, या गोष्टीने मला भारावून टाकले. जर जावेद अख्तर व शबाना आझमी यांनी मला दत्तक घेतले असते, तर आज मी कसं आयुष्य जगत असतो हे माहीत नाही.”

पुढे प्रतीक म्हणाला, “माझ्याबद्दल मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. लोक मला दत्तक घेऊ इच्छित होते. मी लहान होतो, मी फक्त रडायचो. माझ्याबरोबर काय घडत आहे याची मला कल्पना नव्हती.”

पुढे प्रतीकने असेही सांगितले की, त्याच्या आईबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम होते. प्रतीक असेही म्हणाला, “माझ्या आईला जे प्रेम मिळाले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आईबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल सद्भावना होत्या, शबानाजी त्यापैकी एक होत्या. अमिताभ बच्चन खूप प्रेमळ आणि पाठिंबा देणारे होते. मला वाटतं की आईबरोबर ज्यांनी काम केले ते सर्वच कलाकार नसिरुद्दीन साहेब, रत्ना पाठक, श्याम बेनेगल हे सर्वच कलाकार खूप चांगले आहेत, तो काळच वेगळा होता.

प्रतीक बब्बर हा स्मिता पाटील व राज बब्बर यांचा मुलगा आहे. ज्यावेळी स्मिता पाटील व राज बब्बर प्रेमात पडले, त्यावेळी राज बब्बर यांचे आधीच नादिरा यांच्याशी लग्न झाले होते. स्मिता यांच्याशी लग्न करण्यासाठी राज बब्बर यांनी त्यांच्या पत्नीला सोडले. प्रतीकच्या जन्मावेळी वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रतीकला स्मिता पाटील यांच्या आई-वडिलांनी वाढवले. प्रतीकने २००८ साली ‘जाने तू जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक व त्याच्या वडिलांमधील दुराव्यामुळे तो चर्चेत आहे.