Premium

“टायगर श्रॉफचे नवे टॅलेंट…”; गाणं गाताना शेअर केला व्हिडीओ, निक जोनसच्या कमेंटने वेधले लक्ष

निक जोनस आणि किंग यांचे नुकतेच रिलीज झालेले “मान मेरी जान आफ्टरलाइफ…” हे गाणे गातानाचा व्हिडीओ टायगर श्रॉफने शेअर केला आहे.

nick jonas praises tiger shroff
निक जोनस आणि किंग यांचे नुकतेच रिलीज झालेले "मान मेरी जान आफ्टरलाइफ…" हे गाणे गातानाचा व्हिडीओ टायगर श्रॉफने शेअर केला आहे.

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफला आपण चित्रपटांमध्ये नेहमीच अ‍ॅक्शन आणि डान्सचे नवनवे प्रकार करताना पाहतो. मात्र, अलीकडेच टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओतून त्याच्यामधील असलेल्या नव्या टॅलेंटची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओवर ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा नवरा गायक निक जोनसने सुद्धा कमेंट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “ओव्हर अ‍ॅक्टिंगचे पैसे कापा” चेन्नई सुपरकिंग्सने IPL जिंकल्यावर विकी-सारा झाले ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आधी गुजरात…”

टायगर श्रॉफने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो, निकी जोनस आणि किंगचे नुकतेच रिलीज झालेले “मान मेरी जान आफ्टरलाइफ…” हे गाणे गाताना दिसत आहे. टायगरचा सुरेल आवाज ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत त्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे टायगरच्या या व्हिडीओवर निक जोनसने “लव्ह इट ब्रो…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडीओ शेअर करीत टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मान मेरी जान आफ्टरलाइफ…” हे गाणे गाण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे…” तसेच या पोस्टमध्ये टायगरने किंग आणि निक जोनस या दोघांनाही टॅग केले होते. मूळचा अमेरिकन गायक असलेल्या निकने या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदीमध्ये गाणे गायले आहे.

हेही वाचा : “आपण कधी मरतो माहितीये?…” सामान्य गृहिणीला ‘होममेकर’ बनवणाऱ्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकर मुख्य भूमिकेत

टायगरने शेअर केलेल्या गाण्यावर काही कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. जॅकी भगनानीने “खूप सुंदर…”, तर एली अवरामने “ओह माय गॉड…टायगर खूप सुंदर गायले आहेस…” तसेच त्याच्या चाहत्यांनी “डान्स आणि अ‍ॅक्शनशिवाय तू गाणेही सुंदर गातोस”, “टायगरचे नवे टॅलेंट…” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 13:16 IST
Next Story
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या लेकीने आलिशान कार सोडून चक्क रिक्षाने केला प्रवास, व्हिडीओ व्हायरल