राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील एक असं नाव आहे जे वादग्रस्त कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतं. राम गोपाल वर्मा अनेकदा अशी काही वक्तव्य करतो ज्यामुळे वादाला तोंड फुटतं. काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो एका अभिनेत्रीच्या पायांना किस करताना दिसला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली होती. अशातच त्याचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली होती. श्रीदेवी यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्यांच्या सुंदर मांड्यांमुळे मिळाली असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीदेवी यांनी ८० च्या दशकात मोठ्या पडद्यावर राज्य केलं होतं. आपल्या बोलक्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या चाहत्यांची ड्रीम वूमन झाली होती. जेव्हा २०१२ ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं. जवळपास एका दशकानंतर चित्रपटांपासून दूर असलेल्या श्रीदेवी यांचा पुनरागमनानंतरचा पहिलाच चित्रपट तुफान हिट ठरला. पण त्यावेळी राम गोपाल वर्मा यांनी असं काही विधान केलं होतं की, त्यावर बोनी कपूर आणि राम गोपाल वर्मा यांच्यात जोरदार जुंपली होती. “श्रीदेवी यांना त्यांच्या सुंदर मांड्यांनी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली.” असं ट्वीट त्याने केलं होतं.
आणखी वाचा : आधी बायकोची मैत्रीण, मग बांधली राखी अन्… अशी झालेली बोनी कपूर यांच्या आयुष्यात श्रीदेवी यांची एंट्री

राम गोपल वर्माने ट्वीट केलं होतं, “मी श्रीदेवी यांच्या मांड्या, त्यांचं हास्य, त्यांचं अभिनय कौशल्य, संवेदनशीलता आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोनी कपूर यांच्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमाचा मी आदर करतो. पण जर फक्त अभिनय कौशल्य स्टारडमचं कारण असतं तर मी स्मिता पाटील श्रीदेवी यांच्यापेक्षा मोठ्या कलाकार का नव्हत्या. त्यांच्या मांड्यांमुळे दोघींमध्ये फरक निर्माण झाला.”

राम गोपाल यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली. एवढंच नाही तर बोनी कपूर यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पुन्हा राम गोपाल वर्माने बोनी कपूर यांना उद्देशून, “बोनी कपूर यांना माझा सल्ला आहे की माझ्यावर राग काढण्यापेक्षा श्रीदेवी यांच्यावर लिहिलेलं ‘गन्स अँड थाइज’मधील लेख पूर्ण वाचावा.

आणखी वाचा- “श्रीदेवी माझ्या भावाबरोबर…”; निर्माते बोनी कपूर यांनी सांगितला ‘जुदाई’ चित्रपटातला किस्सा

बोनी कपूर आणि राम गोपाल वर्मा यांच्यात यावरून जोरदार वाद झाला होता. राम गोपाल वर्माने आत्मचरित्र ‘गन्स अँड थाइज’मध्ये दिग्दर्शक बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना एक हाउसवाइफ बनवून ठेवल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली होती. या पुस्तकात त्याने विस्ताराने लिहिलं होतं की कशाप्रकारे तो स्वतः श्रीदेवी यांच्या प्रेमात वेडा होता आणि आताही आहे. हेच कारण होतं की बोनी कपूर राम गोपाल वर्मावर भडकले होते. त्यानंतर त्याने स्पष्टीकरण देताना श्रीदेवी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली होती.

दरम्यान याआधीही बोनी कपूर आणि राम गोपाल वर्मा यांच्यात श्रीदेवी यांच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. राम गोपाल वर्माच्या प्रदर्शित न झालेल्या एका चित्रपटामुळे बोनी कपूर खूप नाराज झाले होते. त्यांनी राम गोपाल वर्माला कायदेशीर नोटीस पाठवली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma controversial tweet about sridevi and fight with boney kapoor mrj