Ranbir Kapoor and Deepika Padukone’s video goes viral: दीपिका पादुकोण ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपासून ती तिच्या आठ तासांच्या शिफ्टमुळे चर्चेत आहे. तिच्या या अटीमुळे तिला चित्रपटातील भूमिका गमवाव्या लागल्याचे म्हटले जात आहे. अशातच दीपिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

रणबीर कपूर व दीपिका पादुकोण का चर्चेत आहेत?

सध्या दीपिका पादुकोण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ती आणि रणबीर कपूर विमानतळावर एकत्र दिसले. रणबीर आणि दीपिकाला अनेक वर्षांनंतर एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. दीपिका आणि रणबीरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईबाहेर जाताना आणि पुन्हा येतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये दीपिका व रणबीर एकमेकांचा निरोप घेत असल्याचे दिसत आहे. जाताना ते एकमेकांना मिठी मारतात. दीपिकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे; तर रणबीरने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि चॉकलेटी रंगाचे जॅकेट घातले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. नेटकरी कमेंट्स करीत त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. एकाने लिहिले, “ते एकत्र छान दिसतात.”‌ दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मला वाटते की, त्यांचा कोणता तरी नवीन चित्रपट येणार आहे.”‌आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “त्यांच्यात एक अविश्वसनीय केमिस्ट्री आहे. मला ते दोघे खूप आवडतात.”‌ एका नेटकऱ्याने लिहिले, “ते एकत्र खूप छान दिसतात.” तसेच “रणवीर सिंग चांगला नवरा आहे’, “दीपिका मनापासून आनंदी असल्याचे दिसत आहे”, “आलियाने हे जर पाहिले, तर ती रडेल”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

रणबीर दिल्लीमध्ये त्याच्या आर्क्स या कंपनीच्या नवीन ब्रँडच्या उदघाटनासाठी गेला होता. मात्र, दीपिका दिल्लीला का गेली होती, हे स्पष्ट झाले नाही.

रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांचे रिलेशनशिप

आता रणबीर आणि दीपिका एकत्र दिसल्यानंतर त्याची इतकी चर्चा होण्याचे कारण त्यांचा भूतकाळ आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण रिलेशनशिपमध्ये होते; मात्र त्यांचे नाते तुटले. ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाने रणबीरनं तिची फसवणूक केली आहे, असा आरोप केला होता.

२०११ मध्ये रणबीर कपूरने ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाची फसवणूक केल्याचे मान्य केले होते. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांनी तमाशा, ये जवानी है दिवानी व बचना ए हसीनो यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.