बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. बुधवारी तिने काही प्रायव्हेट फोटो एका न्यूज पोर्टलच्या लोकांनी गुपचूप काढून पोस्ट केल्याचं म्हटलं होतं. जेव्हा आलिया तिच्या घरात आराम करत होती तेव्हाचे हे फोटो होते आणि यावरून आलिया भट्ट भडकली होती. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित न्यूज पोर्टलला चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर आता आलियाचा पती रणबीर कपूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आलियाचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणबीर कपूर नाराज आहे. रिपोर्ट्सनुसार रणबीर कपूर लवकरच संबंधीत न्यूज पोर्टलच्या विरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सध्या तो आगामी चित्रपट ‘अॅनिमल’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचबरोबर त्याच्या ‘तू झूठी मैं मक्कार’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

आणखी वाचा- “एकाच मुलीबरोबर मला कंटाळा येतो…”, सलमान खानने भाग्यश्रीशी बोलताना मुलींबाबत केलेलं ‘असं’ व्यक्तव्य

या प्रकरणाबद्दल रणबीर कपूरला आलिया भट्टच्या इन्स्टाग्राम पोस्टवरूनच समजलं होतं. ज्यानंतर रणबीरने त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून अशाप्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत. तो त्याच्या पत्नीच्या प्रायव्हसीबाबत खूपच गंभीर आहे. या सगळ्या प्रकारामुळे रणबीर स्वतः खूप उदास आहे. कारण तो मीडियाबरोबर नेहमीच चांगलं नातं टिकवून आहे. मात्र ही घटना गंभीर असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

आणखी वाचा- आलिया भट्टबरोबर घडलेल्या ‘त्या’ घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने घेतली दखल, म्हणाले “फोटो काढणाऱ्यांच्या विरोधात…”

दरम्यान आलियाबरोबर घडलेल्या घटनेवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला राग व्यक्त केला आहे. अनुष्का शर्माने यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. “या लोकांनी अशाप्रकारे काही करणं पहिल्यांदाच घडलेलं नाही. जवळपास दोन वर्षांपूर्वी आमचेही गुपचूप फोटो क्लिक करत असताना मी पाहिलं होतं.” असं ती म्हणाली. याशिवाय अर्जुन कपूर, करण जोहर आणि जान्हवी कपूर यांनीही आलिया भट्टला पाठिंबा दिला आहे.