भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या त्याच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. लांब केसातील त्याचा नवा लूक प्रेक्षकांना खूपच भावला आहे. बॉलीवूडमधील स्टायलिश अभिनेता रणवीर सिंहने धोनीबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रणवीर व धोनी दोघेही छान दिसत आहेत.

करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे

रणवीरने धोनीबरोबरचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत त्याने धोनीच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि दोघेही स्मितहास्य करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये रणवीर धोनीच्या गालावर किस करताना दिसतोय. रणवीरने हे फोटो शेअर करताना ‘माझा माही’, असं कॅप्शन दिलंय.

रणवीर व धोनीच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करता आहेत. पण यावर धोनीची पत्नी साक्षीने केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे. कमेंट्समध्ये साक्षीने चार रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

साक्षीने रणवीर व धोनीच्या फोटोंवर केलेली कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, रणवीर व धोनी खूप चांगले मित्र आहेत. ते अनेकदा एकत्र फुटबॉलही खेळतात. दोन वर्षांपूर्वी दोघांचा फुटबॉल मैदानातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.