रवीना टंडन ही ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. अक्षय कुमारबरोबरच्या अफेयरमुळे चर्चेत राहिलेल्या रवीनाने ब्रेकअपनंतर चित्रपट वितरक अनिल थडानींशी लग्न केलं. अनिल थडानींनी रवीनासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. रवीनाने पतीच्या एक्स पत्नीवर ज्यूस फेकला होता.

रवीना टंडन तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली. रवीनाला इंडस्ट्रीत तीन दशकांहून जास्त काळ झाला आहे. आता तर तिची लेक राशा थडानी हिनेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय. रवीनाचे पती अनिल थडानी हे चित्रपट वितरक आहेत. रवीना ही अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे. एकदा रवीनाची भेट तिच्या पतीच्या पहिल्या बायकोशी झाली होती. तेव्हा रवीनाने तिच्या तोंडावर ज्यूस फेकला होता.

रवीना व अनिल यांचे २००४ मध्ये लग्न झाले. अनिल थडानी यांचं पहिलं लग्न नताशा सिप्पीशी झालं होतं. अनिल व रवीना यांच्यात जवळीक वाढल्याने अनिल व नताशाच्या लग्नात दुरावा आला असं म्हणतात. नंतर अनिल थडानींनी नताशा सिप्पीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अनिल व नताशा दिग्दर्शक रितेश सिधवानीच्या दिवाळी पार्टीत भेटले. दोघांमध्ये वाद झाला आणि परिस्थिती इतकी बिघडली की रागाच्या भरात रवीनाने तिच्या पतीच्या एक्स पत्नीवर ज्यूस फेकला होता.

रवीना टंडनला राग का आला होता?

रवीनाला नताशावर राग येण्याचं कारणही तसंच होतं. नताशा वारंवार अनिल थडानींजवळ येत होती, यामुळे रवीनाला राग आला. एका मॅगझीनला दिलेल्या मुला वारंवार तिच्या पतीशी वारंवार संपर्क साधण्याचा केलेला प्रयत्न रवीनाला आवडला नाही आणि यामुळे ती नाराज झाली.

रवीना टंडन काय म्हणाली होती?

दिवाळी पार्टीत इंडस्ट्रीतील बरेच जण होते. सर्वांसमोर हा प्रकार घडल्याने तो कुणाला कळणार नाही, हे शक्यच नाही. रवीना व नताशात जे काही घडलं त्याची नंतर खूप चर्चा झाली. एका मुलाखतीत रवीना टंडनने या प्रकारावर प्रतिक्रिया दिली होती. तसेच नताशाशी ज्या पद्धतीने वागले, त्याचा पश्चात्ताप नसल्याचं रवीनाने म्हटलं होतं. “पार्टीत मी केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल मला पश्चात्ताप नाही. देव आणि माझ्या वडिलांनंतर, माझा पती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. मी कोणालाही त्याच्यावर कोणतेही आरोप करू देणार नाही. जर कोणी त्याच्याबद्दल वाईट बोलत असेल तर ते माझाही अपमान करत आहेत आणि कोणीही माझ्या कुटुंबाचा अपमान करू शकत नाही,” असं रवीना टंडन म्हणाली होती.