रेखा आणि अमिताभ यांचे एकेकाळी अफेअर होते आणि त्या अफेअरच्या बातम्या सर्वश्रूत आहे. पण आता रेखाबाबत एक नवीन दावा करण्यात आला आहे. यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या बायोग्राफीमध्ये अभिनेत्री रेखा त्यांची सेक्रेटरी फरझानाबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रेखाच्या बेडरूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी असणारी फरझाना एकमेव व्यक्ती आहे. मोलकरणीलाही अभिनेत्रीच्या बेडरुममध्ये जाता येत नाही, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा”, युजरने आव्हान दिल्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, “इतका…”

पुस्तकात असं म्हटलंय की “फरझाना रेखासाठी एक परफेक्ट पार्टनर आहे. ती तिची सल्लागार, तिची मैत्रीण आणि तिची सपोर्टर आहे आणि रेखा तिच्याशिवाय जगू शकत नाही. फक्त रेखाची विश्वासू सेक्रेटरी फरझाना, जी काहींनी तिची प्रेयसी असल्याचा दावा केला आहे तिलाच तिच्या बेडरूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. अगदी घरकाम करणाऱ्या मोलकरणीलाही रेखा यांच्या बेडरुममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही.”

मिनाक्षी शेषाद्रीचा पती कोण, मुलं किती? ती सध्या काय करते? जाणून घ्या

पुस्तकात पुढे असा दावा केला आहे की, “फरझाना रेखाच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि घरात येण्याऱ्या-जाण्यावर नियंत्रण ठेवते. ती एक उत्तम गेटकिपर आहे आणि रेखाच्या आयुष्यातील प्रत्येक फोन कॉलवर तिचं लक्ष असतं, असं म्हटलं जातं. रेखाने स्वतःच्या आयुष्यातील गूढ कायम ठेवलंय. यात फरझाना तिला मदत करते.”

“दीपिकाच्या भगव्या बिकिनीने धर्म धोक्यात आला, पण…”; मणिपूर घटनेवर मौन बाळगणाऱ्या कंगनावर गायिकेची टीका; म्हणाली…

इतकंच नाही तर रेखाच्या दिवंगत पतीच्या आत्महत्येमागे फरझाना कारणीभूत असल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. रेखाचे पती मुकेश अग्रवाल हे दिल्लीतील व्यावसायिक होते. १९९० मध्ये रेखा लंडनमध्ये असताना त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती आणि त्यात त्यांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं होतं.

मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूसाठी रेखा यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. या घटनेनंतर सुभाष घई आणि अनुपम खेर यांच्यासारख्या दिग्गजांसह इंडस्ट्रीतील बरेच लोक रेखा यांच्या विरोधात गेले होते, असाही उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rekha biography claims she is in live in relationship with her secretary farzana who has access of actress bedroom hrc