Know which bollywood celebrities not use Instagram: सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, ज्याचा वापर अगदी सामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत आणि लहानापासून वृद्धांपर्यंत सर्व जण करतात. विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती, विविध संघटना, कंपन्या सर्व जणच सोशल मीडियाचा वापर विविध कारणांसाठी करतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एन्फ्लुएन्सर म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण कंटेटमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यामध्ये निसर्ग, पर्यावरण, सामाजिक विषय, विविध विषयांवरील सखोल अभ्यास, पर्यटन, खाद्यसंस्कृती, गाणे, डान्स अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात.
सोशल मीडियामुळे जगभरातील विविध ठिकाणे, तेथील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ, तेथील राजकारण, अर्थकारण अशा विविध गोष्टी सामान्यांच्या नजरेतून ऐकायला पाहायला मिळतात. काही जण सोशल मीडियाचा वापर व्यावसायाचे माध्यम म्हणून करतात. काही जण याकडे विविध कलागुण दाखविण्याचा प्लॅटफॉर्म म्हणून याकडे बघतात. अनेक जण त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात.
बॉलीवूडचे कोणते कलाकार इन्स्टाग्रामचा वापर करीत नाहीत?
कलाकारदेखील सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेक कलाकार त्यांच्या खासगी, तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात. अनेकदा त्यांच्या शूटिंगच्या सेटवरील अनेक गमतीजमती दाखवतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, असेही काही कलाकार आहेत, ज्यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट नाही. तर, अशा कलाकारांबाबत जाणून घेऊयात…
१. सैफ अली खान
या यादीत पहिल्या क्रमाकांवर अभिनेता सैफ अली खान आहे. अभिनेत्याचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट नाही.
२. रणबीर कपूर
सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणबीर कपूरदेखील या यादीत आहे. अभिनेत्याचे अनेक फॅन पेजेस आहेत; पण त्याचे स्वत:चे अकाउंट नाही.
३. राणी मुखर्जी
अभिनेत्री राणी मुखर्जीला काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राणी मुखर्जीदेखील इन्स्टाग्राम वापरत नाही.
४. रेखा
दिग्गज अभिनेत्री ७१ वर्षीय रेखा यादेखील इन्स्टाग्रापासून दूर असल्याचे दिसते.
५. आमिर खान
आमिर खानचेदेखील इन्स्टाग्राम अकाउंट नाही. त्याच्या निर्माती कंपनीचे अकाउंट आहे. तसेच, त्याची काही फॅन पेजेसदेखील आहेत.
या कलाकारांबरोबरच अभिनेत्री अमृता सिंह आणि जया बच्चन या अभिनेत्रीदेखील इन्स्टाग्रामचा वापर करीत नाहीत. आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, जान्हवी कपूर आणि इतर अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.