सैफ अली खानची बिल्डर विरोधात केस, मागितली 'इतक्या' कोटींची नुकसान भरपाई | saif ali khan file case against builder in mumbai | Loksatta

सैफ अली खानची बिल्डर विरोधात केस, मागितली ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई

सैफ अली खानने एका बिल्डर विरोधात केस दाखल केली आहे.

सैफ अली खानची बिल्डर विरोधात केस, मागितली ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई
बिल्डरच्या वागण्याला कंटाळून सैफ अली खानने त्याच्या विरोधात केस दाखल केल्याचं वृत समोर आलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने रावणाची भूमिका साकारली आहे आणि त्या भूमिकेला सोशल मीडियावरून प्रचंड विरोध होताना दिसतोय. खासकरून या चित्रपटातील सैफचा लूक वादाचा विषय ठरला आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला त्याचा ‘विक्रम वेधा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला तर दुसरीकडे आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशात बिल्डरच्या वागण्याला कंटाळून सैफ अली खानने त्याच्या विरोधात केस दाखल केल्याचं वृत समोर आलं आहे. त्याचबरोबर त्याने मोठी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागितली आहे.

सैफ अली खानने मिडसिटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर तीन कमर्शियल आपार्टमेंट खरेदी केले होते. या फ्लॅट्सची किंमत ५३.३४ कोटी रुपये इतकी असल्याचं बोललं जातंय. या आपर्टमेंटचं काम त्याने २०१९ च्या जून महिन्यात पूर्ण करून मागितलं होतं. मात्र बिल्डरने हे काम पूर्ण केलं नाही. ज्यामुळे सैफने त्याच्या विरोधात महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी विभागात तक्रार केली आहे. याचबरोबर सैफने या बिल्डरकडून जवळपास ७ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मागितले आहेत आणि त्यावर १८ टक्के जीएसटीची मागणीही केली आहे.

आणखी वाचा- ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेवरुन वाद, सैफ अली खान म्हणतो “मी ‘महाभारत’ही करेन पण…”

काही रिपोर्ट्सनुसार, बिल्डरने हे आपार्टमेंट्स २०१९ पर्यंत बनवून देण्याचं वचन दिलं होतं मात्र त्याने हे काम वेळेत पूर्ण केलेलं नाही. एकीकडे सैफ अली खानने आपलं म्हणणं मांडलं आहे. तर दुसरीकडे बिल्डरचं म्हणणं आहे की, सैफ अली खानने या कोणताही पेमेंट या अपार्टमेंटसाठी केलेला नाही किंवा आपर्टमेंट घेण्यासाठी कोणतीही रुची दाखवलेली नाही. सैफला अपार्टमेंट्स तयार झाल्याची माहिती देण्यात आली होती असं बिल्डरचं म्हणणं आहे. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अथॉरिटने सैफ आणि बिल्डरला पार्शियल रिलीफ दिला आहे.

सैफ अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच सैफ अली खानचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता, मात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ‘विक्रम वेधा’ अपयशी ठरला. यासोबतच आगामी काळात सैफ अली खान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सॅनन आणि सनी सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2022 at 09:38 IST
Next Story
“समोर ज्येष्ठ नागरिक…” फोटो काढणाऱ्यांवर कियारा अडवाणी भडकली; व्हिडिओ होतोय व्हायरल