करीना कपूर खान आणि सैफ अली खान बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जोड्यांपैकी एक मानले जातात. दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांमध्ये बरीच चर्चेत असते. आता या दोघांच्या लग्नाला जवळपास १२ वर्ष होऊन गेली आहेत. मात्र दोघांमधील प्रेम आजही पूर्वीसारखंच आहे. करीना कपूर आणि सैफ यांच्यात वयाचा मोठा फरक आहे. पण सैफला पहिल्या भेटीच्या वेळीच करीना खूप आवडली होती. एका चॅट शोमध्ये सैफने करीना कपूरबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो करीना कपूरबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना दिसत आहे. सैफने एका चॅट शोमध्ये याचा खुलासा केला होता की, करीना कपूर आणि त्याची पहिली भेट मुंबईतील एका स्टुडिओमध्ये झाली होती. जेव्हा त्याने पहिल्यांदा करीनाला पाहिलं होतं तेव्हाच ती त्याला खूप आवडली होती. करीनाबरोबरच्या पहिल्या भेटीचा खुलासा सैफने ‘क्या आप पांचवी पास से तेज हैं?’ या शाहरुख खानच्या शोमध्ये केला होता.

आणखी वाचा- “…आणि विजेता आहे शिव ठाकरे”, Bigg Boss 16 Finale आधी व्हायरल होतोय ‘तो’ व्हिडीओ

या शोमध्ये सैफने सांगितलं की, “मी करीनाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये मी शूटिंग करत होतो आणि त्यावेळी मेकअप रुमच्या बाहेर एक छोटी मुलगी बसलेली मी पाहिली होती. ती तिथे एकटीच बसली होती आणि माझ्याकडे पाहत होती. तर मी कोणालातरी विचारलं की ही कोण आहे? त्यावर त्याने सांगितलं की ही करीना कपूर आहे, करिश्मा कपूरची लहान बहीण. ती मला त्यावेळीच खूप आवडली होती.”

आणखी वाचा- वडील सैफ अली खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळताच साराची प्रतिक्रिया काय होती? अमृताकडे गेली आणि…

सोशल मीडियावर करीना-सैफचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. एकीकडे सैफ या शोमध्ये करीनाबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल बोलत आहे तर दुसरीकडे सैफचं बोलणं ऐकून करीना खळखळून हसताना दिसत आहे. करीना आणि सैफच्या लव्ह स्टोरीची सुरुवात चित्रपटाच्या सेटवरून झाली होती. दोघांनीही ‘टशन’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मग २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं. दोघांच्या वयात १३ वर्षांचं अंतर आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan open up about his first meet with kareena kapoor mrj