प्रभासची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘सालार पार्ट १: सीझफायर’ हा चित्रपट आज (२२ डिसेंबर) रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. एक दिवसाआधी शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘डंकी’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही चित्रपटात चांगली स्पर्धा होईल असं दिसतंय. अशातच सालार चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर रिव्ह्यू दिले आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच भावल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खानचा ‘डंकी’ काल म्हणजेच २१ डिसेंबर रोजी रिलीज झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली आहे. ‘सालार’ आता एका दिवसानंतर प्रदर्शित झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही त्याने ‘डंकी’ला मागे टाकलं होतं. आता प्रेक्षकांचे रिव्ह्यू आणि या चित्रपटाची क्रेझ बघता पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘सालार’ ‘डंकी’ला मागे टाकू शकतो, असं दिसतंय. प्रेक्षकांना ‘सालार’ चित्रपट प्रचंड आवडला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करून प्रभासच्या या सिनेमाचं कौतुक केलंय. सध्या प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभासला ‘आदिपुरुष’ फ्लॉप झाल्यानंतर ‘सालार’च्या रुपात एक हिट चित्रपट मिळू शकतो.

Video: सलमान खान आला, अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली अन् शेजारी असलेल्या अभिषेकला…, तिघांचाही व्हिडीओ चर्चेत

एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) प्रेक्षकांनी ‘सालार’ बद्दल दिलेल्या प्रतिक्रिया

‘सालार’मध्ये प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट पहिल्या दिवशी ‘डंकी’ पेक्षा जास्त कमाई करेल, असं दिसत आहे. ‘सालार’ हा चित्रपट २ तास ५५ मिनिटांचा आहे. ‘सालार’ ६ हजार स्क्रीनवर रिलीज झाला असला तरी ‘डंकी’च्या तुलनेत त्याच्या शोची संख्या खूपच कमी आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ ४ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला असून त्याचे १५ हजारांहून अधिक शो आहेत. तर ६ हजार स्क्रीन्स असूनही ‘सालार’ च्या शोची संख्या १२ हजारांपेक्षा कमी आहे. मात्र, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘सालार’ ने ‘डंकी’ ला मागे टाकले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salaar public review fans praised prabhas cinema says it will replace dunki in theaters hrc