प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर कलाकारांमध्ये मजामस्ती ही होतच असते. अनेकदा काही कलाकार आपल्या सहकलाकारांबरोबर प्रँक करत असतात. अशाच एका बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर सलमान खानने प्रँक केला होता; ज्यामुळे अभिनेत्रीला अक्षरश: रडू कोसळले होतं. नेमका हा प्रँक काय होता? चला जाणून घेऊ हा रंजक किस्सा…

‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनी त्यांच्याबरोबर घडलेला प्रँक शेअर केला आहे. स्वत: सलमाननेच हा प्रँक तिच्याबरोबर केला होता. चित्रपटातील एका सीनवरुन सलमानने इंदिरा कृष्णन यांना बॅन करण्याची धमकी दिली होती. अर्थात हा प्रँक होता. पण त्यामुळे इंदिरा कृष्णन यांना रडू कोसळलं होतं. तसंच त्यांना करिअरची चिंतासुद्धा वाटली होती.

‘तेरे नाम’ या चित्रपटात एका सीनमध्ये इंदिरा कृष्णन यांना सलमानच्या कानाखाली मारायची होती. याबद्दल इंदिरा सांगतात, “चित्रपटात सलमानला कानाखाली मारायचा सीन होता. तो सीन शुट करण्यापूर्वी सलमान म्हणाला – ‘जर तू मला मारलंस; तर पुढे काय होईल हे सांगता येणार नाही.”

यापुढे त्या सांगतात, “त्या सीननंतर सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड दोघांनी मिळून माझ्याबरोबर हा प्रँक केला. त्याचा बॉडीगार्ड म्हणाला, ‘मॅडम, तुम्ही काय केलंत? पत्रकार आलेत. तुम्ही व्हॅनमध्ये जाऊन बसा. हा प्रँक असेल अशी शक्यता मला तेव्हा वाटतच होती; पण तेव्हा त्यांचा अभिनय इतका चांगला होता की, यामुळे मी खरंच घाबरले. बाहेर पाहिलं, तर काही मीडियाचे लोक खरंच तिथे होते. मला वाटलं खरंच काहीतरी मोठं झालंय. त्यांनी मला सांगितलं – ‘मॅडम, आता तुम्हाला इंडस्ट्रीतून बॅन करणार… तुम्ही काय केलंत… तुम्ही ‘भाई’ला कानाखाली मारलीत?”

इंदिरा कृष्णन इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर त्या सांगतात, “हे सगळं ऐकून मी रडायलाच लागले. पण मग तासाभरानंतर मला कळलं की हा एक प्रँक आहे. दरम्यान, ‘तेरे नाम’ हा चित्रपट अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांच्या करिअरसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि त्यांचं नाव इंडस्ट्रीत प्रसिद्धीझोतात आलं. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

सलमान खान आणि भूमिका चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात इंदिरा यांनी भूमिकाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. इंदिरा कृष्णन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या लवकरच रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या चित्रपटात कौशल्याच्या भूमिकेत झळकणार आहेत.