Satish Kaushik Passed Away: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कलाकार मंडळींनी गर्दी केली आहे. वर्सोवा येथील त्यांच्या राहत्या घरी बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी पोहोचली आहेत. शिवाय सतीश यांच्या घराबाहेर तुफान गर्दी जमली आहे.

आणखी वाचा – ३८ वर्ष सुखाने संसार केल्यानंतर पतीने अर्धवट सोडली साथ; जाणून घ्या सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांच्याबद्दल

सतीश यांना अखेरचा निरोप देताना कलाकारांना दुःख अनावर होत आहे. अनुपम खेर यांनी अभिषेक बच्चन आल्यानंतर त्याला मिठी मारली. यावेळी अनुपम यांना अश्रू अनावर झाले. तर सतीश यांच्या घराबाहेरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांना घरामध्ये नेण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.

सतीश यांचं पार्थिव रुग्णवाहिकेमधून बाहेर आणत घरी नेण्यात आलं आहे. यादरम्यानचा व्हिडीओ पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. सतीश यांना स्मशान भूमीपर्यंत नेण्यासाठी एक पेटी तयार करण्यात आली आहे. या पेटीमधूनच सतीश यांना घरी नेण्यात आलं. सतीश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाकारांची त्यांच्या घराबाहेर गर्दी जमली आहे.

आणखी वाचा – Video : १० वर्षांच्या लेकीसह सतीश कौशिक यांचा भन्नाट डान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या.