Shah Rukh Khan Quits Smoking : शाहरुख खानचा वाढदिवस हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी एक आनंदाचा दिवस असतो. यावर्षी २ नोव्हेंबर रोजी सर्वांचा लाडका ‘किंग खान’ ५९ वर्षांचा झाला. गेली अनेक वर्षे शाहरुखने या इंडस्ट्रीवर आपलं अधिराज्य गाजवलं आहे. एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीला खलनायक म्हणून उदयास आलेला शाहरुख हळुहळू बॉलीवूडचा रोमँटिक हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. लहान मुलांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण त्याचा चाहता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखच्या अनेक गोष्टी चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहेत. पण, त्याची एक सवय जी आयुष्यात कोणीही आत्मसात करू नये अशी स्वत: किंग खानची सुद्धा इच्छा होती. त्याच्या कुटुंबीयांपासून त्याचे चाहते सुद्धा शाहरुखने सिगारेट पिणं सोडून द्यावं यासाठी आग्रही होते आणि अखेर याबद्दलचा मोठा खुलासा अभिनेत्याने त्याच्या ५९ व्या वाढदिवशी केला आहे.

हेही वाचा : आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

शाहरुख खानने ( Shah Rukh Khan ) त्याच्या वाढदिवशी ‘मीट अँड ग्रीट’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या मुलाखतीत अभिनेत्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान शाहरुखने त्याने सिगारेट ओढायची सवय कायमस्वरुपी सोडल्याचं सांगितलं. अभिनेत्याचा खुलासा ऐकून त्याचे चाहते जल्लोष करू लागले. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

२०१७ मध्ये शाहरुखने एका मुलाखतीत, “मी माझी मुलं आर्यन, सुहाना आणि अबरामसाठी धूम्रपान सोडू इच्छित आहे” असं सांगितलं होतं आणि आता ५९ व्या वाढदिवशी पार पडलेल्या कार्यक्रमात किंग खानने खरंच त्याच्या सगळ्या चाहत्यांना सिगारेट सोडून वाढदिवसाचं मोठं रिटर्न गिफ्ट दिल्याचं आता बोललं जात आहे. याआधी २०११ मध्ये ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत किंग खानने तो दिवसाला १०० सिगारेट ओढायचा आणि जवळपास ३० कप ब्लॅक कॉफी प्यायचा असं सांगितलं होतं. त्यामुळे शाहरुखच्या धूम्रपान सोडण्याच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : प्रसाद खांडेकरच्या नाटकामुळे झालेली पहिली भेट अन्…; ‘अशी’ जमली पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची जोडी! खूपच हटके आहे लव्हस्टोरी

शाहरुख या कार्यक्रमात म्हणाला, “एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो…मी आता धूम्रपान करत नाही. मला वाटलं होतं मला श्वासोच्छवासाचा एवढा त्रास होणार नाही. पण, मला त्याचा थोडा त्रास जाणवत आहे. पण इन्शा अल्लाह सगळं ठीक होईल”

दरम्यान, किंग खानच्या ( Shah Rukh Khan ) या व्हायरल होणार्‍या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्याने योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan quits smoking once admitted he smoke 100 cigarettes per day sva 00